Home / महाराष्ट्र / Baramati Election Result 2026 : सुनेत्रा पवारांची ‘रेकॉर्डब्रेक’ घोडदौड! १५ व्या फेरीतच सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा विक्रम-पाहा मतांची आकडेवारी..

Baramati Election Result 2026 : सुनेत्रा पवारांची ‘रेकॉर्डब्रेक’ घोडदौड! १५ व्या फेरीतच सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा विक्रम-पाहा मतांची आकडेवारी..

Baramati Election Result 2026 : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार...

By: Team Navakal
Baramati Election Result 2026 :
Social + WhatsApp CTA

Baramati Election Result 2026 : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी वर्चस्व राखले आहे. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांनी केवळ मोठी आघाडीच घेतली नाही, तर दिवंगत नेते अजित पवार यांचा मागील विधानसभा निवडणुकीतील विजयाचा विक्रमही अवघ्या १५ व्या फेरीतच मोडीत काढला आहे.

१५ व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांची विक्रमी आघाडी
१५ व्या फेरीअखेर समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांनी विजयाच्या दिशेने ऐतिहासिक घोडदौड सुरू ठेवली आहे. सुनेत्रा पवार यांना मिळालेली एकूण मते: १,२१,८५५ मते. इतर सर्व उमेदवारांना मिळालेली एकूण मते: २,४६८ मते

अजित पवार यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १ लाख १ हजार मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी अवघ्या १५ व्या फेरीतच १ लाख २१ हजार ८५५ मतांचा टप्पा गाठून अजितदादांचा मागील मताधिक्याचा विक्रम मोडीत काढला आहे.

या ऐतिहासिक आघाडीमुळे सुनेत्रा पवार यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि पार्थ पवार यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केलेला विक्रमी मतदानाचा विश्वास आता प्रत्यक्ष निकालातून खरा ठरताना दिसत आहे. या पोटनिवडणुकीत एकूण २४ फेऱ्या होणार असून, उर्वरित फेऱ्यांनंतर सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य कुठपर्यंत पोहोचते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

करुणा मुंडे यांची बारामती निकालावर पहिली प्रतिक्रिया-
या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या करुणा मुंडे यांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार ८५ मते मिळाली आहेत. पराभवानंतरही त्यांनी अत्यंत सकारात्मक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या “या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय झाला आणि माझी हार झाली; पण ‘हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है’. ज्या दिवशी माझा उमेदवारी अर्ज वैध ठरला, त्याच दिवशी मी खऱ्या अर्थाने जिंकले होते. कारण, मी ही निवडणूक लढू नये यासाठी अनेक स्तरांवरून मोठे प्रयत्न झाले होते. मला एक मत मिळो वा एक लाख, मी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढले याचा मला सार्थ अभिमान आहे. मी बारामतीच्या मतदारांनी दिलेल्या कौलाचा नम्रपणे आदर करते.”

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या