Mahindra Thar Roxx based ATV for Indian Army : महिंद्रा कंपनीने पुन्हा एकदा स्वदेशी ताकद दाखवत भारतीय सुरक्षा दलांसाठी एक खास भेट तयार केली आहे. कंपनीने आपल्या बहुचर्चित Mahindra Thar Roxx या एसयूव्हीवर आधारित एक जबरदस्त ऑल-टेरेन व्हीकल समोर आणले आहे. हे वाहन विशेषतः दुर्गम भागात आणि सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आले असून, लवकरच ते लष्कराकडे चाचणीसाठी पाठवले जाणार आहे.
सामान्य थारपेक्षा कशी आहे वेगळी?
जरी समोरून पाहताना यात मूळ मॉडेलसारख्या एलईडी हेडलाईट्स दिसत असल्या, तरी ही गाडी प्रत्यक्षात एखाद्या छोट्या रणगाड्यासारखी आहे.
- मजबूत बंपर: यात अतिशय जड बंपर बसवण्यात आला आहे, ज्यामध्ये विंच लावण्यात आली आहे. यामुळे चिखलात किंवा खड्ड्यात अडकल्यास गाडी स्वतःला बाहेर खेचू शकते.
- सुरक्षा कवच: काचेच्या संरक्षणासाठी लोखंडी पाईपचे एक खास जाळे तयार करण्यात आले आहे. बोनेटवर एक मोठा जॅकही दिला आहे, जेणेकरून तातडीने दुरुस्ती करणे शक्य होईल.
हल्ल्यासाठी ‘टरेट’ची सुविधा
जवानांना तातडीने गाडीत चढता-उतरता यावे यासाठी यात जड दरवाजे काढून पाईपचा ढाचा लावला आहे. गाडीची छत पूर्णपणे काढून तिथे एक मजबूत ‘रोल केज’ बसवले आहे. यावर 360-डिग्री फिरणारे ‘टरेट’ बसवता येते, ज्यावर मशीन गन फिट करून शत्रूवर हल्ला करणे सोपे होईल.
दुर्गम भागातील प्रवासासाठी सज्ज
- टायर आणि ग्राऊंड क्लीअरन्स: यात 18 इंचाचे अतिशय मजबूत टायर असून गाडीची उंची वाढवण्यात आली आहे.
- खास बॅग्स: लष्कराचे सामान आणि शस्त्रास्त्रे ठेवण्यासाठी यात खास ‘मॉले सिस्टिम’ देण्यात आली आहे.
- इंधन साठा: गाडीच्या मागील भागात अतिरिक्त दोन टायर आणि इंधनासाठी खास ‘जेरीकेन होल्डर’ दिले आहेत.
इंजिनची प्रचंड शक्ती
या वाहनात 2.2 लिटरचे दमदार डिझेल इंजिन आहे, जे 172bhp ची पॉवर आणि 400Nm का टॉर्क निर्माण करते. यात 4×4 सिस्टिम असल्याने डोंगर, वाळू किंवा चिखल अशा कोणत्याही रस्त्यावर ही गाडी सहज धावू शकते. आतील सीटला ‘आर्मी ग्रीन’ रंग देण्यात आल्याने याला पूर्णपणे लष्करी लूक मिळाला आहे.
हे देखील वाचा – West Bengal CM Race: बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय! आता मुख्यमंत्री कोण? ‘या’ नावांची जोरदार चर्चा










