Home / मनोरंजन / Raja Shivaji Movie: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटासाठी सलमान, अभिषेक बच्चन यांनी किती मानधन घेतले? जाणून घ्या

Raja Shivaji Movie: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटासाठी सलमान, अभिषेक बच्चन यांनी किती मानधन घेतले? जाणून घ्या

Raja Shivaji Movie: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट 1 मे 2026 रोजी चित्रपटगृहात...

By: Team Navakal
Raja Shivaji :
Social + WhatsApp CTA

Raja Shivaji Movie: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट 1 मे 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळत आहे.

मात्र, या चित्रपटाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि भावूक करणारी माहिती समोर आली आहे. यातील मुख्य कलाकारांनी या चित्रपटासाठी कोणतेही मानधन (Fees) न घेता काम केले आहे.

मैत्री आणि आदरासाठी विनामोबदला काम

चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याने अलीकडेच खुलासा केला की, या ऐतिहासिक चित्रपटासाठी बहुतेक कलाकारांनी केवळ प्रेम आणि आदरापोटी हजेरी लावली. रितेशने सांगितले की, “मी, सलमान खान, अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, बोमन इराणी आणि जेनेलिया देशमुख यांनी या चित्रपटासाठी एकही पैसा आकारलेला नाही. आम्ही सर्वांनी ‘प्रो बोनो’ (विनामोबदला) काम केले आहे.”

रितेश पुढे म्हणाला की, ही 23 वर्षांच्या कारकिर्दीत कमावलेली मैत्रीची शिदोरी आहे. अभिषेक बच्चनने तर भूमिकेबद्दल विचारण्याआधीच चित्रपटाला होकार दिला होता.

बड्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका

  • रितेश देशमुख: छत्रपती शिवाजी महाराज
  • संजय दत्त: अफजल खान
  • अभिषेक बच्चन: संभाजी शहाजी भोसले (महाराजांचे थोरले बंधू)
  • विद्या बालन: खदिजा सुलताना
  • सलमान खान: विशेष पाहुणा (कॅमिओ)

कथा आणि समीक्षण

हा चित्रपट शिवाजी भोसले यांच्या सुरुवातीच्या वर्षांचा प्रवास आणि त्यांनी प्रस्थापित सत्तांना आव्हान देऊन ‘हिंदवी स्वराज्य’ कसे उभे केले, याचे चित्रण करतो. तसेच, या चित्रपटात महिला पात्रांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जिजाबाईंच्या भूमिकेत भाग्यश्री आणि सईबाईंच्या भूमिकेत जेनेलिया देशमुख यांनी इतिहासाला साजेसा अभिनय केला आहे.

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती असलेला हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्याही अत्यंत प्रबळ असल्याचे मानले जात आहे. मैत्रीसाठी आणि इतिहासाप्रती असलेल्या आदरासाठी कलाकारांनी मानधन नाकारल्याने या चित्रपटाची उंची अधिकच वाढली आहे.

हे देखील वाचा – 

TCS Nashik Case: 25 दिवसांचा लपाछपीचा खेळ संपला! फरार निदा खान अखेर गजाआड; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Web Title:
संबंधित बातम्या
Operation Tiger

Operation Tiger : मातोश्रीला पडलेल्या भगदाडावर एकनाथ शिंदेंची पहिली कडक प्रतिक्रिया!ते ६ टायगर शिवसेनेत आलेत, ना तुडवायला, ना आडवायला-आम्ही फक्त शिवसेना वाढवायला निघालोय’ म्हणत शिंदेनी टीकाकारांना सुनावले..