Home / लेख / WhatsApp वापरण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार ? कंपनीने सुरू केली ‘ही’ नवीन सेवा

WhatsApp वापरण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार ? कंपनीने सुरू केली ‘ही’ नवीन सेवा

WhatsApp Plus subscription for iPhone users: लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या आयफोन युजर्ससाठी एक मोठी घोषणा केली असून, ‘WhatsApp Plus’...

By: Team Navakal
WhatsApp Plus subscription for iPhone users
Social + WhatsApp CTA

WhatsApp Plus subscription for iPhone users: लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या आयफोन युजर्ससाठी एक मोठी घोषणा केली असून, ‘WhatsApp Plus’ ही नवीन पेड सबस्क्रिप्शन सेवा लाँच केली आहे. ही सेवा सध्या मर्यादित आयफोन युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, याद्वारे युजर्सना त्यांचे अ‍ॅप अधिक वैयक्तिकृत आणि आकर्षक बनवण्यासाठी अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, व्हॉट्सअ‍ॅपचे मूळ मेसेजिंग आणि कॉलिंग फीचर्स नेहमीप्रमाणे सर्वांसाठी मोफतच राहतील.

काय आहे WhatsApp Plus?

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या आयओएस आवृत्ती 26.17.74 वर ही सुविधा उपलब्ध झाली आहे. हे एक ऐच्छिक सबस्क्रिप्शन असून केवळ वैयक्तिक मेसेंजर अ‍ॅपसाठी आहे, व्हॉट्सअ‍ॅप बिझनेससाठी नाही. ही सेवा सध्या काही युरोपीय देशांमध्ये सुरू झाली असून, लवकरच ती इतर बाजारपेठांमध्येही विस्तारली जाईल.

किंमत आणि ट्रायल कालावधी

युरोपमध्ये या सेवेची किंमत दरमहा 2.49 युरो (साधारण 274 रुपये) ठेवण्यात आली आहे. भारतात या सेवेची किंमत वेगळी असू शकते. विशेष म्हणजे, पात्र युजर्सना ही सेवा अनुभवण्यासाठी १ महिना किंवा १ आठवड्याची फ्री ट्रायल (Free Trial) देखील दिली जात आहे. युजर्स अ‍ॅप स्टोअरच्या माध्यमातून हे सबस्क्रिप्शन मॅनेज किंवा कॅन्सल करू शकतात.

मिळणार ‘हे’ ६ प्रीमियम फीचर्स

  1. कस्टम थीम्स आणि कलर्स: युजर्सना १८ वेगवेगळे अ‍ॅक्सेंट कलर्स मिळतील, ज्यामुळे अ‍ॅपचा पूर्ण इंटरफेस बदलता येईल.
  2. नवीन अ‍ॅप आयकॉन्स: अ‍ॅपसाठी १४ नवीन आणि स्टायलिश आयकॉन्सचा पर्याय दिला आहे.
  3. जास्त चॅट्स पिन करण्याची सोय: सध्या युजर्स केवळ ३ चॅट्स पिन करू शकतात, मात्र सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तब्बल 20 चॅट्स पिन करता येतील.
  4. एक्सक्लुझिव्ह स्टिकर्स: युजर्सना विशेष अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स पॅक डाऊनलोड करता येतील.
  5. नवीन रिंगटोन्स: यात फ्लटर, टेम्पो, रिपल आणि कार्निव्हल यांसारखे १० नवीन आणि विशेष रिंगटोन्सचे पर्याय दिले आहेत.
  6. चॅट लिस्ट मॅनेजमेंट: विशिष्ट चॅट लिस्टसाठी समान थीम आणि नोटिफिकेशन टोन सेट करण्याची सुविधा यात मिळते.

जर तुम्हाला ही सेवा हवी असेल, तर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘सेटिंग्ज’ मेनूमध्ये जाऊन ती उपलब्ध आहे की नाही हे तपासू शकता. ज्यांना हे सबस्क्रिप्शन घ्यायचे नाही, त्यांच्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचे नियमित फीचर्स नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

हे देखील वाचा – PM Modi’s Appeal: “विदेशी चलन वाचवा!”; पंतप्रधान मोदींचे इंधन बचत आणि सोनं खरेदी टाळण्याचे देशवासीयांना पुन्हा एकदा आवाहन

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या