Home / महाराष्ट्र / VIP Culture Control: मंत्र्यांच्या ‘विमान’ वारीला ब्रेक! मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक नियम; आता विमानासाठी द्यावा लागणार अर्जी

VIP Culture Control: मंत्र्यांच्या ‘विमान’ वारीला ब्रेक! मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक नियम; आता विमानासाठी द्यावा लागणार अर्जी

VIP Culture Control: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचे पडसाद आता महाराष्ट्र प्रशासनात उमटू लागले...

By: Team Navakal
VIP Culture Control: मंत्र्यांच्या 'विमान' वारीला ब्रेक! मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक नियम; आता विमानासाठी द्यावा लागणार अर्जी
Social + WhatsApp CTA

VIP Culture Control: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचे पडसाद आता महाराष्ट्र प्रशासनात उमटू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांच्या सरकारी विमान वापरावर कडक निर्बंध घातले असून, आता कोणत्याही मंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय विमान प्रवास करता येणार नाही.

VIP Culture Control: बावनकुळेंनी दिली नियमांची माहिती

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नव्या नियमांची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधानांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मी स्वतः वर्षातून केवळ ४ ते ५ वेळाच अत्यंत तातडीच्या कामासाठी विमान वापरतो. मुख्यमंत्री अत्यंत व्यस्त असल्याने ते विमानाने प्रवास करतात, मात्र आता इतर सर्व मंत्र्यांसाठी परवानगी अनिवार्य असेल.”

बावनकुळे यांनी हेदेखील नमूद केले की, ते स्वतः अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष न बोलावता बहुतांश बैठका ऑनलाइन पद्धतीनेच घेतात.

VIP Culture Control: नितेश राणेंकडून विभागाला कडक निर्देश

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर मत्स्य विकास व बंदर मंत्री नितेश राणे यांनी तत्काळ आपल्या विभागात बदलांचे वारे सुरू केले आहेत. त्यांनी विभागातील सर्व बैठका आतापासून ‘ऑनलाइन’ घेण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, इंधन बचतीसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नेमकी ही वेळ का आली?

जागतिक स्तरावर इंधन आणि वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे भारताच्या परकीय चलन साठ्यावर (डॉलर) ताण येत आहे. जेव्हा भारत तेल, गॅस किंवा सोने आयात करतो, तेव्हा त्याचे पैसे डॉलरमध्ये मोजावे लागतात. डॉलरचा साठा जपण्यासाठी आणि रुपयाची किंमत टिकवून ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनावश्यक खर्चाला कात्री लावत आहे.

पंतप्रधानांचा ‘७ कलमी’ बचत मंत्र:

१. इंधन बचत: पेट्रोल-डिझेलचा वापर किमान करा.

२. सुवर्ण मर्यादा: सध्या सोन्याची खरेदी टाळा.

३. वर्क फ्रॉम होम: शक्य असेल तिथे घरून कामाला प्राधान्य द्या.

४. स्वदेशी: भारतीय उत्पादनांचा वापर वाढवा.

५. पर्यटन: परदेश प्रवास टाळून देशांतर्गत पर्यटनाला महत्त्व द्या.

६. नैसर्गिक शेती: खतांची आयात कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळा.

७. खाद्यतेल: आयातीवरील खर्च वाचवण्यासाठी खाद्यतेलाचा मर्यादित वापर करा.

NEET-UG 2026 Re-exam Date: पेपरफुटीच्या आरोपानंतर NEET परीक्षा पुन्हा कधी होणार? NTA ने दिली माहिती

Web Title:
संबंधित बातम्या