Home / लेख / Cheapest Electric Cars: पेट्रोल-डिझेलचं टेन्शन विसरा! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा इलेक्ट्रिक कार; पाहा टॉप 5 स्वस्त ई-गाड्यांची लिस्ट

Cheapest Electric Cars: पेट्रोल-डिझेलचं टेन्शन विसरा! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा इलेक्ट्रिक कार; पाहा टॉप 5 स्वस्त ई-गाड्यांची लिस्ट

Cheapest Electric Cars: भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची (EV) मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. एकेकाळी महागड्या वाटणाऱ्या या गाड्या...

By: Team Navakal
Cheapest Electric Cars
Social + WhatsApp CTA

Cheapest Electric Cars: भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची (EV) मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. एकेकाळी महागड्या वाटणाऱ्या या गाड्या आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाल्या आहेत. बॅटरी अ‍ॅज अ सर्व्हिस (BaaS) या नवीन मॉडेलमुळे इलेक्ट्रिक कारच्या किमतीत मोठी घट झाली आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ५ सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहोत, ज्या बजेटमध्ये असूनही जबरदस्त फीचर्स देतात.

1. MG Comet EV: देशातील सर्वात स्वस्त कार

२०२३ मध्ये लाँच झाल्यापासून एमजी कॉमेट ईव्ही ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरली आहे. ‘BaaS’ मॉडेलमुळे या कारची सुरुवातीची किंमत आता केवळ 4.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात 17.3kWh ची बॅटरी असून एकदा फुल चार्ज केल्यावर ही कार 250 किमी धावते.

2. TATA Punch EV: ५-स्टार सेफ्टी आणि दमदार रेंज

टाटाची सर्वात लोकप्रिय मिनी एसयूव्ही आता इलेक्ट्रिक रूपात आणखी स्वस्त झाली आहे. २०२६ च्या नवीन मॉडेलनुसार, टाटा पंच ईव्हीची ‘BaaS’ मॉडेलसह किंमत केवळ 6.49 लाख रुपयांपासून सुरू होते. यात दोन बॅटरी ऑप्शन्स असून लॉंग रेंज मॉडेल एका चार्जमध्ये 468 किमीची रेंज देते.

3. TATA Tiago EV: मध्यमवर्गीयांची पहिली पसंती

टाटा टियागो ईव्ही ही भारताच्या ईव्ही मार्केटमधील गेमचेंजर कार आहे. याची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते. यात 19.2kWh आणि 24kWh असे दोन बॅटरी पर्याय मिळतात. ही कार एका चार्जमध्ये 250 ते 315 किमीपर्यंत धावू शकते.

4. MG Windsor EV: लक्झरी आणि परफॉर्मन्स

एमजी विंडसर ईव्ही ही एक प्रीमियम लुकिंग कार आहे, जी ‘BaaS’ मॉडेलमध्ये 9.99 लाख रुपयांना उपलब्ध आहे. यात 38kWh आणि 52.9kWh च्या बॅटरी असून ही गाडी ४४९ किमीपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे.

5. Maruti Suzuki e Vitara: मारुतीचा पहिला इलेक्ट्रिक धमाका

देशातील सर्वात मोठ्या कार कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘ई-विटारा’ लाँच केली आहे. याच्या ‘BaaS’ मॉडेलची सुरुवातीची किंमत 10.99 लाख रुपये आहे. यात 42kWh आणि 61kWh चे दोन मोठे बॅटरी पॅक मिळतात. मोठी बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यावर ५४३ किमीपर्यंतची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे.

हे देखील वाचा- Pune Bomb Scare: पुण्यातील नामांकित रुग्णालयाबाहेर ‘बॉम्ब’ सापडल्याने खळबळ! ७ तासांचा टायमर अन् स्फोटके; पोलिसांनी काय माहिती दिली?

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या