Home / देश-विदेश / PM Modi on Foreign Travel Tax: परदेश प्रवासावर नवीन कर लागणार? सोशल मीडियावरील ‘त्या’ चर्चेवर स्वतः पंतप्रधान मोदींनी दिले स्पष्टीकरण

PM Modi on Foreign Travel Tax: परदेश प्रवासावर नवीन कर लागणार? सोशल मीडियावरील ‘त्या’ चर्चेवर स्वतः पंतप्रधान मोदींनी दिले स्पष्टीकरण

PM Modi on Foreign Travel Tax: आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे देशात विविध करांमध्ये वाढ होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले...

By: Team Navakal
PM Modi on Foreign Travel Tax
Social + WhatsApp CTA

PM Modi on Foreign Travel Tax: आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे देशात विविध करांमध्ये वाढ होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच, केंद्र सरकार परदेश प्रवासावर (फॉरेन ट्रॅव्हल) नवीन कर किंवा अतिरिक्त शुल्क लावण्याचा विचार करत असल्याचा दावा एका मोठ्या वृत्तवाहिनीने केला होता.

या वृत्तामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर थेट प्रतिक्रिया देत हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

PM Modi on Foreign Travel Tax: पंतप्रधान मोदींचे थेट उत्तर: “बातमीत तीळमात्रही सत्य नाही”

एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने एक वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात म्हटले होते की, इराण युद्धाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा भार पेलण्यासाठी सरकार परदेश प्रवासावर एक वर्षासाठी विशेष कर लावणार आहे.

या बातमीवर थेट आक्षेप घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट केली. पंतप्रधान म्हणाले, “ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. यात तीळमात्रही सत्य नाही. परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध किंवा कर लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही देशातील नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी आणि व्यापार सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

PM Modi on Foreign Travel Tax: वृत्तवाहिनीने मागितली जाहीर माफी

पंतप्रधानांच्या या थेट आक्षेपानंतर संबंधित वृत्तवाहिनीने अवघ्या काही मिनिटांतच आपली ती बातमी मागे घेतली. तसेच, “परदेश प्रवासावरील कराबाबतचे आमचे वृत्त अचूक नव्हते. आम्ही ती बातमी मागे घेत आहोत आणि या चुकीबद्दल खेद व्यक्त करतो,” अशी पोस्ट करत त्यांनी जाहीर माफी मागितली.

PM Modi on Foreign Travel Tax: पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन

काही दिवसांपूर्वीच तेलंगणा येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले होते. गरज नसेल तर अवाजवी परदेश दौरे आणि सोन्याची खरेदी टाळावी, जेणेकरून जागतिक युद्धाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहील, असे त्यांनी म्हटले होते. याच आवाहनाचा चुकीचा अर्थ काढून सोशल मीडियावर कराच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या.

दरम्यान, इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने देशात नुकतीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, परदेश प्रवासावर कोणताही अतिरिक्त कर लावला जाणार नसल्याने आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या