Home / महाराष्ट्र / Rohit Pawar : अजित पवारांबद्दल एका बड्या नेत्याचे आक्षेपार्ह वक्‍तव्य ! ऑडिओ क्‍लिप! सुनेत्रा, पार्थने ऐकली! पक्षात भूकंप

Rohit Pawar : अजित पवारांबद्दल एका बड्या नेत्याचे आक्षेपार्ह वक्‍तव्य ! ऑडिओ क्‍लिप! सुनेत्रा, पार्थने ऐकली! पक्षात भूकंप

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष रोज नव्या दाव्याने उघड होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे...

By: Team Navakal
Rohit Pawar
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष रोज नव्या दाव्याने उघड होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक मुलाखती दिल्या आणि त्यात खळबळजनक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले की, अजित पवार यांच्याबद्दल त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याने आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले. त्याची ऑडिओ क्लिप आहे. हा ऑडिओ सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ऐकला आहे. तेव्हापासूनच संघर्ष वाढला आहे.


रोहित पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादीतील दोन वरिष्ठ नेत्यांपैकी एका नेत्याने अजित पवारांबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन वक्तव्य केल्याची दिल्लीत रेकॉर्ड केलेली ऑडिओ क्लिप एका नेत्याकडे आहे. मी स्वतः ती क्लिप ऐकलेली नाही. पण ती कुणाकडे आहे ते मला माहीत आहे. अजित दादांनी ती क्लिप ऐकली होती. त्यांच्या अपघाती निधनानंतर आणि राष्ट्रवादीचे निवडणूक आयोगाला दिलेले पत्र समोर यायच्या आधी तो ऑडिओ पार्थ आणि सुनेत्राकाकींनी ऐकला. त्या क्लिपमध्ये दादांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेत बोलले गेले आहे. तो ऑडिओ कुणाकडे आहे ते माहिती आहे, त्यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे. मात्र त्यांनी तो ऑडिओ मला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवण्यास नकार दिला. त्या ऑडिओ क्लिपनंतर पक्षात नाट्यमय घडामोडी झाल्या.कारण एवढ्या अनुभवी लोकांना सहज कोणी डावलत नाही. जर ते नेते खरच कार्यक्षम आणि प्रामाणिक असते तर त्यांचे पद काढले असते का?  त्या दोन नेत्यांचे पद गाळण्यात आले. भविष्यात मंत्री आदिती तटकरे यांच्याऐवजी सुनील शेळके यांना पद मिळण्याची शक्यता आहे.


त्यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादींची युती झाल्यानंतर मी शेवटचे 4 महिने अजितदादांसोबत होतो. पटेल आणि तटकरे हे 22 वर्षांपासून पक्षात आहेत. त्यावेळी पटेल आणि तटकरेंना शरद पवार साहेबांनी सांभाळून घेतले. प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली, तटकरेंवरही पोलीस केस सुरू झाली. त्यावेळीही पटेल यांच्यासोबत दादांचे तितके चांगले नव्हते. तटकरेंशी संबंध चांगले होते. शेवटच्या चार महिन्यांमध्ये मी दादांसोबत काम केले. त्यावेळी दादा वेगवेगळ्या मुद्यांवर व्यक्त व्हायचे. त्यातल्या त्यात पटेल आणि तटकरे यांच्याबद्दल दादा जास्तच नकारात्मक पद्धतीने व्यक्त होत होते. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे याची कुणकुण दादांना काही प्रमाणात लागली होती. म्हणून पुढील राजकारण पाहता दोन्ही पक्ष एकत्र आले तर लोकांसाठी काम करताना फायदा होईल, अशी त्यांची भूमिका होती. कुठे ना कुठे काही लोकांवर नक्कीच दादांची नाराजी होती. मात्र दादा असल्याने काही गोष्टी नियंत्रणात राहिल्या. नंतर एक कागद, पत्र निवडणूक आयोगाला दिला होता. त्यात सही या दोघांचीच होती. दादा गेल्यानंतर पक्षाचे नियंत्रण ताब्यात घ्यावे यासाठी ते प्रयत्न करत होते. हे सरळ सरळ जाणवले. त्यानंतर त्यांना काही बोलता आले नाही.

याशिवाय अजित पवार गटाच्या अर्थकारणावर आणि पक्षाच्या निधीवर आता पूर्णपणे पवार कुटुंबाचे नियंत्रण आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे खजिनदार पदाची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी पक्षाच्या निधीचे आणि खर्चाचे अधिकार सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असायचे. आता मात्र पक्षाचा कोणताही अधिकृत खर्च करायचा असल्यास या तिघांपैकी एकाची किंवा सर्वांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. या निर्णयाने वरिष्ठ नेत्यांचे अधिकार काढून घेतल्याने पक्षात एक प्रकारची असुरक्षितता निर्माण झाली आहे. तिजोरीची चावी सुनेत्रा पवार कुटुंबाकडे आल्यामुळे आता येत्या काळात ब्यूटी पार्लर किंवा खासगी प्रवासासाठी हेलिकॉप्टर वापरणे हे पक्षाच्या खर्चात येणार नाही. यापूर्वी एका वरिष्ठ महिला नेत्या किंवा संबंधित व्यक्तीने स्वतःच्या ब्यूटी पार्लरचे हजारो रुपयांचे बिल थेट पक्षाच्या निधीमधून भागवले होते. रोहित पवार यांनी हा गौप्यस्फोट केल्याने खळबळ माजली आहे. याच स्थितीत पार्थ पवार यांनी काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उमेश पाटील यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की, ती ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी. आपण ती फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू आणि त्याची सत्यता पडताळून पाहू. रोहित पवारांना बालिश मुद्दे उपस्थित करण्याची सवय  लागली आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या