Home / देश-विदेश / PM Modi Sweden Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान! ‘रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार’ने गौरव; मिळाले रवींद्रनाथ टागोरांचे खास गिफ्ट

PM Modi Sweden Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान! ‘रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार’ने गौरव; मिळाले रवींद्रनाथ टागोरांचे खास गिफ्ट

PM Modi Sweden Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या स्वीडनच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असून त्यांना या स्कॅन्डिनेव्हियन देशाचा सर्वोच्च सन्मान...

By: Team Navakal
PM Modi Sweden Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान! 'रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार'ने गौरव; मिळाले रवींद्रनाथ टागोरांचे खास गिफ्ट
Social + WhatsApp CTA

PM Modi Sweden Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या स्वीडनच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असून त्यांना या स्कॅन्डिनेव्हियन देशाचा सर्वोच्च सन्मान ‘रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार’ प्रदान करण्यात आला आहे. स्वीडनच्या राजकन्यr (क्राउन प्रिन्सेस) व्हिक्टोरिया यांनी पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांच्या उपस्थितीत एका विशेष समारंभात मोदींना हा सर्वोच्च बहुमान दिला.

पंतप्रधान मोदींच्या शिरपेचात रोवला गेलेला हा 31 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. गॉथनबर्ग विमानतळावर पोहोचल्यानंतर स्वीडनच्या पंतप्रधानांनी त्यांचे जंगी स्वागत केले होते.

काय आहे ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार’?

  • इतिहास: या ऐतिहासिक पुरस्काराची सुरुवात 1748 मध्ये झाली होती.
  • हेतू: स्वीडन देशासाठी किंवा स्वीडनच्या हितासाठी सार्वजनिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जागतिक नेत्यांना आणि व्यक्तींना हा सन्मान दिला जातो.
  • स्वरूप: या पुरस्काराचे पदक एका काळ्या रिबनवर किंवा गळ्यात घालण्याच्या पट्टीवर (कॉलर) जोडलेले असते. यातील काळा रंग अज्ञानाचा अंधार दर्शवतो, ज्याला भेदून हा पोलर स्टार (ध्रुवतारा) प्रकाशाची नवी दिशा दाखवतो.

स्वीडन सरकारकडून मिळाले एक अतिशय दुर्मिळ गिफ्ट

या दौऱ्यात पंतप्रधान मोदींना दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक असलेली एक अतिशय खास भेटवस्तू देण्यात आली. कोबाल्ट-ब्लू रंगाच्या एका सुंदर बॉक्समध्ये नोबेल विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या हाताने लिहिलेल्या दोन कवितांच्या हुबेहूब प्रती (फॅक्सिमिलिज) मोदींना भेट म्हणून देण्यात आल्या.

या बॉक्समध्ये टागोरांनी 1921 आणि 1926 मध्ये केलेल्या स्वीडन दौऱ्याची माहिती आणि उप्सला युनिव्हर्सिटीमधील त्यांचा एक दुर्मिळ फोटो देखील आहे. यातील एक कविता बंगाली आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिलेली आहे.

या ऐतिहासिक हस्तलिखितांचा शोध स्वीडनच्या राष्ट्रीय अभिलेखागारातून (नॅशनल आर्काइव्ह्ज) लागला होता. प्रसिद्ध लेखक स्वेन हेडिन यांनी 1921 मध्ये स्टॉकहोम येथे टागोरांचे आदरातिथ्य केले होते, त्यांच्या वैयक्तिक संग्रहातून हे दस्तऐवज मिळाले आहेत.

दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा आणि व्यापारी करार

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर देण्यात आला.

याशिवाय पर्यावरणपूरक बदल (ग्रीन ट्रान्झिशन), आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI), स्टार्टअप्स, अंतराळ क्षेत्र, हवामान बदल आणि संरक्षण तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2025 मध्ये 7.75 अब्ज डॉलरवर पोहोचला असून यामध्ये आणखी वाढ करण्यावर एकमत झाले.

हे देखील वाचा – Pune Dagdusheth Ganpati: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मिळाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या