Home / देश-विदेश / US Navy Jet Collision: एअर शो दरम्यान 2 फायटर जेट्स हवेतच एकमेकांना धडकले; वैमानिकांचा चमत्कारीक बचाव; पाहा व्हिडिओ

US Navy Jet Collision: एअर शो दरम्यान 2 फायटर जेट्स हवेतच एकमेकांना धडकले; वैमानिकांचा चमत्कारीक बचाव; पाहा व्हिडिओ

US Navy Jet Collision: अमेरिकेतील वेस्टर्न इडाहो येथील माउंटेन होम एअर फोर्स बेसवर सुरू असलेल्या एका भव्य एअर शो दरम्यान...

By: Team Navakal
US Navy Jet Collision: एअर शो दरम्यान 2फायटर जेट्स हवेतच एकमेकांना धडकले; वैमानिकांचा चमत्कारीक बचाव; पाहा व्हिडिओ
Social + WhatsApp CTA

US Navy Jet Collision: अमेरिकेतील वेस्टर्न इडाहो येथील माउंटेन होम एअर फोर्स बेसवर सुरू असलेल्या एका भव्य एअर शो दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. हवेत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करत असताना अमेरिकन नौदलाची दोन लढाऊ विमाने एकमेकांना धडकली आणि जमिनीवर कोसळली. या भीषण अपघातानंतर विमानातील सर्व 4 क्रू मेंबर्स म्हणजेच वैमानिकांनी वेळीच पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षितपणे बाहेर झेप घेतली.

नेव्हल एअर फोर्सेसच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टन येथील इलेक्ट्रॉनिक्स अटॅक स्क्वाड्रन 129 मधील दोन ‘EA18-G Growlers’ या विमानांचा हा अपघात झाला. ही दोन्ही विमाने हवेत प्रात्यक्षिके करत असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर लष्करी तळ तात्काळ लॉकडाऊन करण्यात आला आणि एअर शोचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.

US Navy Jet Collision: हवेत विमाने एकमेकांना चिकटली आणि…

शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या व्हिडिओंमध्ये दोन्ही विमाने हवेत अतिशय जवळ येतात आणि एकमेकांना स्पर्श करतात. त्यानंतर दोन्ही विमाने गोल फिरत एकाच वेळी खाली कोसळू लागतात. विमाने जमिनीवर आदळण्यापूर्वीच ४ वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडतात आणि आकाशात ४ पॅराशूट उघडताना दिसतात. जमिनीवर पडताच विमानांचा मोठा स्फोट झाला आणि आगीचे गोळे हवेत उसळले. सुदैवाने, लष्करी तळावरील कोणत्याही प्रेक्षकाला किंवा नागरिकाला दुखापत झालेली नाही आणि सर्व वैमानिकांची प्रकृती स्थिर आहे.

US Navy Jet Collision: तज्ज्ञांनी व्यक्त केले आश्चर्य; वैमानिकांचे प्राण कसे वाचले?

हवेतील अशा धडकेत सहसा वैमानिकांना बाहेर पडण्याची संधी मिळत नाही. मात्र, या अपघातात ४ ही जण वाचणे हा एक चमत्कार मानला जात आहे. विमान वाहतूक सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, दोन्ही विमाने अशा विशिष्ट पद्धतीने एकमेकांना धडकली की, ती तुटण्याऐवजी हवेतच एकमेकांना अडकून राहिली आणि एकत्र खाली आली.

याच कारणामुळे वैमानिकांना विमानाबाहेर पडण्यासाठी (इजेक्ट होण्यासाठी) पुरेसा वेळ मिळाला. हा अपघात कोणत्याही यांत्रिक बिघाडामुळे झालेला नसून फॉर्मेशन फ्लाईट दरम्यान अंतराचा अंदाज चुकल्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

US Navy Jet Collision: एअर शो आणि सुरक्षेचा इतिहास

हा ‘गनफायटर स्काइज’ इव्हेंट या तळावर 2018 नंतर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता, कारण 2018 मध्ये एका हँग ग्लायडर पायलटचा येथे अपघाती मृत्यू झाला होता. तसेच 2003 मध्येही येथे एका प्रात्यक्षिकादरम्यान विमान कोसळले होते, ज्यात वैमानिक जमिनीवर आदळण्याच्या अवघ्या एक सेकंद आधी बाहेर पडला होता.

अमेरिकेत दरवर्षी सुमारे 200 एअर शो होतात. आकडेवारीनुसार, 1991 ते 2006 दरम्यान अशा शोमध्ये दरवर्षी सरासरी 3.8 मृत्यू होत होते, जे प्रमाण आता सुधारून 2017 पासून वार्षिक सरासरी 1.1 वर आले आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेत 1952 नंतर एअर शो दरम्यान एकाही प्रेक्षकाचा मृत्यू झालेला नाही. या अपघाताचा तपास आता यूएस नेव्ही करत असून दोन्ही विमानांचे वैमानिक सुरक्षित असल्याने अपघाताचे नेमके कारण लवकरच समोर येईल.

हे देखील वाचा – Pune Dagdusheth Ganpati: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मिळाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Web Title:
संबंधित बातम्या