Home / लेख / SBI FD Return Scheme: स्टेट बँकेच्या एफडीमध्ये १ लाख गुंतवल्यास किती परतावा मिळेल? पाहा व्याजाचे संपूर्ण गणित

SBI FD Return Scheme: स्टेट बँकेच्या एफडीमध्ये १ लाख गुंतवल्यास किती परतावा मिळेल? पाहा व्याजाचे संपूर्ण गणित

SBI FD Return Scheme: आपल्या कष्टाची पुंजी सुरक्षित राहावी आणि त्यावर निश्चित परतावा मिळावा, अशी इच्छा असणाऱ्या मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ...

By: Team Navakal
SBI FD Return Scheme: स्टेट बँकेच्या एफडीमध्ये १ लाख गुंतवल्यास किती परतावा मिळेल? पाहा व्याजाचे संपूर्ण गणित
Social + WhatsApp CTA

SBI FD Return Scheme: आपल्या कष्टाची पुंजी सुरक्षित राहावी आणि त्यावर निश्चित परतावा मिळावा, अशी इच्छा असणाऱ्या मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट योजना हा एक सर्वात विश्वासार्ह मार्ग ठरत आहे. विशेषतः शेअर बाजारातील अनपेक्षित चढ-उतारांपासून दूर राहून ज्यांना सुरक्षित गुंतवणूक हवी आहे, त्यांच्यासाठी ही योजना कमालीची फायदेशीर आहे.

अति वरिष्ठ नागरिकांना १.६४ लाखांचा फायदा

या योजने अंतर्गत जर एखाद्या अति वरिष्ठ नागरिकाने 1 लाख रुपये गुंतवले, तर त्याला 7 वर्षांमध्ये तब्बल 64,227 रुपयांचे निव्वळ व्याज मिळू शकते. याचा अर्थ मुदतपूर्तीनंतर संबंधित ग्राहकाच्या खात्यात एकूण 1,64,227 रुपये जमा होतील.

स्टेट बँकेत ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार अगदी 7 दिवसांपासून ते थेट 10 वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या कालावधीसाठी पैसे जमा करण्याची सुविधा मिळते. सध्या बँकेकडून या विविध कालावधीसाठी 3.05 टक्क्यांपासून ते 7.15 टक्क्यांपर्यंत व्याजदराचा लाभ दिला जात आहे.

दीर्घ मुदतीसाठीचे आकर्षक व्याजदर

जर तुम्ही 5 ते 10 वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवणार असाल, तर बँकेचे व्याजदर श्रेणीनुसार पुढीलप्रमाणे आहेत:

  • सामान्य नागरिकांसाठी: 6.05 टक्के व्याज
  • वरिष्ठ नागरिकांसाठी: 7.05 टक्के व्याज
  • अति वरिष्ठ नागरिकांसाठी: 7.15 टक्के व्याज

१ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ७ वर्षांत मिळणारा परतावा

समजा तुम्ही या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि ती 7 वर्षांसाठी तशीच ठेवली, तर वेगवेगळ्या वयोगटानुसार मुदत संपल्यानंतर हातामध्ये येणारी रक्कम खालीलप्रमाणे असेल:

  • सामान्य ग्राहक: 7 वर्षांची मुदत संपल्यानंतर 52,246 रुपयांच्या व्याजासह एकूण 1,52,246 रुपये परत मिळतील.
  • वरिष्ठ नागरिक: या श्रेणीत येणाऱ्या व्यक्तींना याच कालावधीत 63,101 रुपयांचे व्याज मिळून एकूण रक्कम 1,63,101 रुपये होईल.
  • अति वरिष्ठ नागरिक: या ग्राहकांना बँकेच्या सर्वाधिक व्याजदराचा फायदा मिळतो; त्यामुळे त्यांना 64,227 रुपयांचे व्याज मिळून मॅच्युरिटीच्या वेळी एकूण 1,64,227 रुपये दिले जातील.

कोणतीही आर्थिक जोखीम नाही

स्टेट बँक आपल्या जेष्ठ आणि अति ज्येष्ठ ग्राहकांना नेहमीच सामान्य नागरिकांपेक्षा अतिरिक्त व्याजदराचा विशेष बहुमान देते. निवृत्तीनंतर मिळालेला निधी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही आर्थिक जोखमीशिवाय हमखास उत्पन्न मिळवण्यासाठी या योजनेला मोठी पसंती दिली जाते. जागतिक बाजारपेठेतील मंदी किंवा इतर कोणत्याही आर्थिक घडामोडींचा या निश्चित परताव्यावर कोणताही परिणाम होत नाही, हाच या योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे.

हे देखील वाचा – PM Modi Norway Visit: राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल! नॉर्वे दौऱ्यातील ‘त्या’ घटनेवरून टीका

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या