Home / News / Cockroach Janata Party Warns of Protest if Education Minister Refuses to Quit : केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच पार्टी रस्त्यावर आंदोलन करणार! दीपकेचा इशारा

Cockroach Janata Party Warns of Protest if Education Minister Refuses to Quit : केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच पार्टी रस्त्यावर आंदोलन करणार! दीपकेचा इशारा

Cockroach Janata Party Warns of Protest if Education Minister Refuses to Quit – देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या समाजमाध्यमांवरील कॉकरोच जनता...

By: Team Navakal
Cockroach Janata Party Warns of Protest if Education Minister Refuses to Quit
Social + WhatsApp CTA


Cockroach Janata Party Warns of Protest if Education Minister Refuses to Quit – देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या समाजमाध्यमांवरील कॉकरोच जनता पार्टीने सत्ताधार्‍यांना धडकी भरवली आहे. काही दिवसांतच दोन कोटींहून अधिक सदस्य बनलेल्या या पक्षाने आता नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या मुद्यावर आक्रमक होत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा स्पष्ट इशारा दिपकेने दिला आहे.


कॉकरोच जनता पार्टी केवळ ऑनलाईन चळवळ न राहता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करणार आहे, असे या पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके याचे म्हणणे आहे. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या निवेदनावर सही करा, असे आवाहन पार्टीने केले आहे. या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट आता हॅक झाले आहे. याआधी त्यांचे एक्स अकाऊंट भारतात बंद करण्यात आले. त्यातच दिपकेला धमकी देण्यात आली की, भाजपात सामील हो नाहीतर खतम करू. धमकी देणार्‍याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. दरम्यान, धमक्या मिळाल्यावर त्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील घराबाहेर पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.


शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर रस्त्यावर आंदोलन केले जाईल असे सांगत अभिजित दीपके म्हणाला की, आमच्या आंदोलनाची तुलना नेपाळ किंवा बांगलादेशातील आंदोलनांशी करू नये. तो जेन – झी पिढीचा अपमान ठरेल. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यावर आमचा भर आहे. हिंसा करणे किंवा अस्थिरता निर्माण करणे हा आमचा उद्देश नाही. आमचा विश्वास केवळ लोकशाहीवर आणि शांततापूर्ण मार्गावर आहे. समाजमाध्यामावर सुरू झालेली ही चळवळ आता प्रत्यक्षात येऊ लागली आहे. ती फक्त जेन-झी पुरती मर्यादित नाही.

16-17 वर्षांचे विद्यार्थीदेखील सध्याच्या व्यवस्थेविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. मला दररोज असे व्हिडिओ मिळत आहेत, ज्यात लोक कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने विविध उपक्रम करताना दिसतात. काहीजण यमुना नदी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही टी-शर्टवर पक्षाचे लोगो तयार करत आहेत. गाड्यांवर स्टिकर लावत आहेत आणि स्थानिक गटही निर्माण करत आहेत. आम्ही ठरवले आहे की, भविष्यात राजकीय पातळीवर पुढे जायचे असल्यास, सर्वप्रथम लोकांशी चर्चा करून सामूहिक निर्णय घेतले जातील.
प्रश्न – तुम्हाला समाज माध्यमांवर इतका प्रचंड पाठिंबा मिळतो आहे. त्यावरून असे वाटते का की, सध्याचे तरुण निराश आहेत. त्यांना बदल हवा आहे?


अभिजित दीपके – हे खरे आहे. आम्हाला जे संदेश मिळत आहे त्यावरून असे म्हणता येईल की, आजचे तरुण खूप नैराश्यात आहेत. त्यांचा केवळ व्यवस्थेवरील विश्वास उडालेला नाही तर सध्याच्या सरकार आणि विरोधी पक्षाबाबतही ते निराश आहेत. आपले मुद्दे कुणीच उचलत नाही, असे त्यांना वाटत आहे.


काँग्रेस पक्षाची नव तरुणांशी नाळ का जोडली जात नाही असे विचारता दीपके म्हणाले की, राजकीय पक्ष आणि तरुण पिढी यांच्यात संवादाची दरी निर्माण झाली आहे. आजचे तरुण पारंपरिक पद्धतीने राजकारण पाहत नाहीत. ते लांबलचक पत्रकार परिषदा पाहत बसत नाहीत. राजकीय पक्षांनी तरुण जिथे सक्रिय आहेत तिथे म्हणजे सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर संवाद साधण्याची गरज आहे. तरुणांना समजेल अशा भाषेत आणि शैलीत त्यांच्याशी संवाद साधण्यात ते अपयशी ठरले आहेत. नीटचे प्रकरण झाले तेव्हा विरोधी पक्ष थंड बसून होता. आमच्यामुळे तो मुद्दा गाजल्यावर ते जागे झाले आणि मग आंदोलन करू लागले. कॉकरोच जनता पार्टी एवढ्या कमी वेळात लोकप्रिय होण्याचे हेच एक मोठे कारण आहे. आम्ही तरुणांना समजेल अशा पद्धतीने बोलत आहोत.

निधी संकलन वेबसाईट बोगस?
समाज माध्यमांवर कॉकरोच जनता पार्टीने धुमाकूळ घातला असतानाच ‘ऑफिशियल कॉकरोच जनता पार्टी’ या नावाने एक संशयास्पद संकेतस्थळ (वेबसाईट) तयार करण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांकडून ऑनलाईन पैसे जमा केले जात आहेत. या संकेतस्थळाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या संकेतस्थळावर एक क्यूआर कोड देण्यात आला आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पैसे पाठवण्यासाठी विशाल कुमार शुक्ला हे नाव झळकत आहे. त्यामुळे संभ्रम आणि संशय निर्माण झाला आहे.


या संकेतस्थळावर म्हटले आहे की, सीजेपी ही एक व्यंगात्मक चळवळ आहे, नोंदणीकृत राजकीय पक्ष नाही. जमा होणारा निधी समुदायाच्या वाढीसाठी, वेबसाईट आणि कंटेंटसाठी वापरला जाईल. हा निवडणूक निधी नाही. हा पक्ष नाही, फक्त झुरळ आहे. ना अदानी, ना अंबानी, फक्त तुम्ही. या मजकुरासह नागरिकांना 1 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर 1 लाख 4 हजारांहून अधिक सदस्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. सदस्य नोंदणीसाठी गुगल फॉर्मची लिंक देण्यात आली असून, त्यामध्ये नाव, ई-मेल आयडी आणि फोन नंबर ही माहिती घेतली जात आहे.


Web Title:
संबंधित बातम्या