Arjun Tendulkar LSG Debut: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने 23 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स कडून खेळताना आपल्या नव्या प्रवासाची शानदार सुरुवात केली आहे. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात अर्जुनला चालू हंगामातील त्याचा पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली.
एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अर्जुनने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. त्याने आपल्या कोट्यातील संपूर्ण 4 ओव्हर्स टाकत पंजाबच्या एका सेट फलंदाजाला बाद केले. अर्जुनच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे.
Arjun Tendulkar LSG Debut: वडील सचिन तेंडुलकरची ‘ती’ भावूक पोस्ट
अर्जुनच्या या कामगिरीनंतर क्रिकेट जगतातील दिग्गज सचिन तेंडुलकर स्वतःला रोखू शकला नाही. सामना संपल्यानंतर लगेचच सचिनने ‘X’ वर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सचिन सहसा आपल्या मुलाच्या क्रिकेट कारकिर्दीवर जाहीरपणे बोलणे टाळतो, मात्र यावेळी त्याने अर्जुनच्या संयमाचे कौतुक केले.
सचिनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “खूप छान अर्जुन! या संपूर्ण हंगामात तू ज्या प्रकारे स्वतःला सांभाळलेस, त्याचा मला अभिमान आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, संयम राखणे, शांतपणे मेहनत करणे आणि शेवटच्या सामन्यापर्यंत संधीची वाट पाहत असतानाही सकारात्मक राहणे हे कौतुकास्पद आहे. क्रिकेट हे कौशल्याइतकीच तुमच्या संयमाचीही परीक्षा घेते आणि आज तू दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे हाताळल्यास. नेहमी जमिनीवर पाय ठेवून खेळत राहा आणि क्रिकेटवरील आपले प्रेम असेच कायम ठेव. खूप खूप प्रेम!”
यापूर्वी सचिनने 2023 मध्ये अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले तेव्हा पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आता थेट 2026 मध्ये सचिनने ही पोस्ट केली आहे.
Arjun Tendulkar LSG Debut: मैदानावर काय घडले? अर्जुनची गोलंदाजी कशी होती?
कर्णधार ऋषभ पंतने पॉवरप्ले संपल्यानंतर लगेचच अर्जुन तेंडुलकरच्या हाती चेंडू सोपवला. डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये अर्जुनने अत्यंत आत्मविश्वासाने गोलंदाजी केली:
- पहिला ओव्हर: अर्जुनने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये अचूक बाऊन्सर्स टाकत फलंदाजाला त्रास दिला. यादरम्यान प्रभसिमरन सिंगचा एक झेल यष्टीरक्षक ऋषभ पंतने सोडला. तरीही अर्जुनने संयम न गमावता पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 धावा दिल्या.
- दुसरा आणि तिसरा ओव्हर: दुसऱ्या ओव्हरमध्ये श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरनने जोरदार फलंदाजी करत 15 धावा वसूल केल्या. मात्र, १५ व्या ओव्हरमध्ये अर्जुनने हुशारीने पुनरागमन केले.
- पहिला विकेट: पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंग 69 धावांवर खेळत असताना, अर्जुनने एक वेगवान आणि अचूक यॉर्कर टाकला. या चेंडूवर प्रभसिमरन पूर्णपणे चकवला गेला आणि एलबीडब्ल्यू झाला. अशा प्रकारे अर्जुनने लखनऊसाठी आपला पहिला विकेट घेतला.
Arjun Tendulkar LSG Debut: डेथ ओव्हर्समध्ये दाखवला दम
सामन्याच्या 17 व्या ओव्हरमध्ये म्हणजेच डेथ ओव्हर्समध्ये अर्जुन पुन्हा गोलंदाजीसाठी आला. दबावाच्या परिस्थितीतही त्याने उत्कृष्ट नियंत्रण दाखवले आणि या ओव्हरमध्ये पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके मारू न देता केवळ 5 धावा दिल्या. जरी पंजाबने या सामन्यात विजय मिळवला असला, तरी अर्जुनने आपल्या गोलंदाजीने आणि अचूक यॉर्करने चाहत्यांची मने जिंकली.
हे देखील वाचा – Sonam Wangchuk CJP: ‘मी सन्माननीय झुरळ!’ सोशल मीडियावरील ‘कॉकरोच’ आंदोलनाला सोनम वांगचुक यांचा जाहीर पाठिंबा









