Home / देश-विदेश / BLA Woman Commondor : “आमची जमीन सोडा नाहीतर”…; बलूच महिला कमांडरचा पाकिस्तानला अल्टीमेटम, BLA चा व्हिडिओ चर्चेत

BLA Woman Commondor : “आमची जमीन सोडा नाहीतर”…; बलूच महिला कमांडरचा पाकिस्तानला अल्टीमेटम, BLA चा व्हिडिओ चर्चेत

BLA Woman Commondor – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, फुटीरतावादी संघटना बलुच लिबरेशन आर्मी (BLA )...

By: Team Navakal
BLA Woman Commondor
Social + WhatsApp CTA

BLA Woman Commondor – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून, फुटीरतावादी संघटना बलुच लिबरेशन आर्मी (BLA ) ने प्रथमच आपल्या महिला ब्रिगेडचा व्हिडिओ जाहीर केला आहे. या व्हिडिओमध्ये शायनाझ बलूच (Shaynaz Baloch) नावाची महिला कमांडर समोर आली असून तिने थेट पाकिस्तान सरकारला “बलूचची जमीन सोडा, नाहीतर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल” असा इशारा दिला आहे. या व्हिडिओमुळे बलुचिस्तानमधील परिस्थिती आणि BLA ची रणनीती पुन्हा चर्चेत आली आहे.

बीएलएच्या प्रचार शाखेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुमारे ११ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये शायनाझ बलूच हिने माध्यमे, स्थानिक नागरिक आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला संबोधित केले. डोंगराळ भागात हत्यारांसह उभ्या असलेल्या महिलांसोबत ती दिसते. या व्हिडिओद्वारे संघटनेने स्पष्ट संदेश दिला आहे की आता महिलादेखील या लढ्यात सक्रियपणे उतरल्या असून, भविष्यातील संघर्षात त्यांची भूमिका अधिक ठळक असेल.

शायनाझ बलूचने आपल्या भाषणात आरोप केला की पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा दलांकडून बलूच लोकांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. “बलूच महिलांना आता शस्त्र उचलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,” असे ती म्हणाली. तसेच तिने विशेषतः महिलांना संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन करत “आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी पुढे या” असा संदेश दिला.

विशेष म्हणजे, २०२२ पासून बीएलए महिलांना संघटनेत सामील करून घेण्यावर भर देत आहे. युवा वर्गासोबतच महिलांनाही सक्रिय करण्याचा हा प्रयत्न संघटनेच्या रणनीतीचा भाग असल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर महिला कमांडरचा व्हिडिओ जाहीर करणे हे संघटनेचे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे.

एअरपोर्ट सिक्योरिटी फोर्सच्या अधिकाऱ्यांना अटक

BLA ने पाकिस्तानच्या एअरपोर्ट सिक्योरिटी फोर्स (ASF) मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. वसीम अहमद असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते उपसंचालक आणि कमांडिंग ऑफिसर पदावर कार्यरत असल्याचे सांगितले जाते. बलुचिस्तानातील कलात जिल्ह्यात अधिकृत दौऱ्यावर असताना ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाबाबत अधिक माहिती पुढील व्हिडिओद्वारे दिली जाईल, असे बीएलएने म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बलुचिस्तानमध्ये हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुरक्षा दल आणि फुटीरतावादी गटांमध्ये चकमकी, हल्ले आणि अपहरणाच्या घटनांमुळे परिस्थिती अधिकच चिघळत आहे. अशा परिस्थितीत महिला कमांडरचा हा व्हिडिओ समोर आल्याने संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकूणच, बलुचिस्तानमधील अस्थिरता, बीएलएची वाढती आक्रमकता आणि महिलांचा वाढता सहभाग या सगळ्यामुळे पाकिस्तानसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुढील काळात या घडामोडी कोणत्या दिशेने जातात, याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या