Home / क्रीडा / Gurinderveer Singh : भारताचा ‘उसेन बोल्ट’! गुरिंदरवीर सिंगने १०० मीटर शर्यत अवघ्या १०.०९ सेकंदांत पूर्ण करत रचला इतिहास

Gurinderveer Singh : भारताचा ‘उसेन बोल्ट’! गुरिंदरवीर सिंगने १०० मीटर शर्यत अवघ्या १०.०९ सेकंदांत पूर्ण करत रचला इतिहास

Gurinderveer Singh – झारखंडमधील रांची येथे असलेल्या बिरसा मुंडा स्टेडियममध्ये भारतीय ॲथलेटिक्ससाठी (Athletics) एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. पंजाबच्या २५...

By: Team Navakal
Gurinderveer Singh
Social + WhatsApp CTA

Gurinderveer Singh – झारखंडमधील रांची येथे असलेल्या बिरसा मुंडा स्टेडियममध्ये भारतीय ॲथलेटिक्ससाठी (Athletics) एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. पंजाबच्या २५ वर्षीय धावपटू Gurinderveer Singh याने पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत अवघ्या १०.०९ सेकंदांची वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम (National Record) आपल्या नावावर केला. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या (AFI) फेडरेशन चषक स्पर्धेत त्याने केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशभरात त्याची चर्चा सुरू झाली आहे.

गुरिंदरवीरची ही कामगिरी यासाठीही ऐतिहासिक ठरली की भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात प्रथमच एखाद्या धावपटूने १०.१० सेकंदांचा टप्पा पार केला आहे. १०० मीटरची शर्यत १०.१० सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

अंतिम फेरीत इतिहास रचला

रांचीच्या बिरसा मुंडा स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम फेरीत गुरिंदरवीर आणि ओडिशाचा वेगवान धावपटू Animesh Kujur यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. उपांत्य फेरीत दोघांनीही राष्ट्रीय विक्रम मोडला होता.प्रथम गुरिंदरवीरने १०.१७ सेकंदांची वेळ नोंदवत विक्रम मोडला. मात्र अवघ्या पाच मिनिटांनंतर अनिमेष कुजूरने १०.१५ सेकंदांची वेळ देत राष्ट्रीय विक्रम पुन्हा आपल्या नावावर केला. त्यामुळे अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अंतिम शर्यतीत गुरिंदरवीरने सर्वांना मागे टाकत १०.०९ सेकंदांची ऐतिहासिक वेळ नोंदवली आणि भारतीय ट्रॅक अँड फील्ड इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले.

भारतीय जीन्स मजबूत आहेत

शर्यत जिंकल्यानंतर गुरिंदरवीरने ट्रॅकवरच जल्लोष केला. अंतिम रेषा (Finish Line) पार करताच त्याने आपल्या छातीवरील बिब नंबर फाडला आणि धावण्याचे बूट हवेत फेकून आनंद व्यक्त केला.यानंतर बोलताना तो म्हणाला, “लोक म्हणायचे की भारतीयांमध्ये १०० मीटर शर्यतीसाठी आवश्यक जीन्स नाहीत. मला सर्वांना चुकीचे सिद्ध करायचे होते. भारतीय जीन्स खूप मजबूत आहेत आणि ही तर फक्त सुरुवात आहे.”

आशियातील दुसरी सर्वात वेगवान वेळ

गुरिंदरवीरची १०.०९ सेकंदांची वेळ ही चालू हंगामातील संपूर्ण आशिया खंडातील दुसरी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. तो जपानच्या Fukuto Komuro याच्या १०.०८ सेकंदांच्या वेळेपेक्षा अवघ्या ०.०१ सेकंदांनी मागे राहिला.याचबरोबर त्याने २०२६ राष्ट्रकुल स्पर्धांसाठीचा पात्रता निकष (Qualification Mark) देखील सहज पार केला. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी १०.१६ सेकंदांची अट होती.

विशालनेही रचला नवा इतिहास

या स्पर्धेत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. भारतीय धावपटू Vishal याने पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत ४४.९८ सेकंदांची वेळ नोंदवत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला.४५ सेकंदांपेक्षा कमी वेळेत ४०० मीटर शर्यत पूर्ण करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. विशालची ही वेळ चालू हंगामातील आशियातील सर्वात वेगवान वेळ मानली जात आहे.
तामिळनाडूचा Rajesh Ramesh ४५.३१ सेकंदांसह दुसऱ्या, तर उत्तर प्रदेशचा Jai Kumar ४५.४७ सेकंदांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.

कोण आहे ‘उसेन बोल्ट’?

गुरिंदरवीरच्या विक्रमानंतर त्याची तुलना आता जगातील महान धावपटू Usain Bolt याच्याशी केली जात आहे. उसेन बोल्ट हा जमैकाचा माजी ऑलिम्पिक धावपटू असून त्याला जगातील सर्वात वेगवान मानव मानले जाते.
१०० मीटर शर्यत त्याने अवघ्या ९.५८ सेकंदांत पूर्ण केली होती. हा विश्वविक्रम (World Record) २००९ मध्ये बर्लिन येथे नोंदवण्यात आला होता. तसेच २०० मीटर शर्यतीत त्याच्या नावावर १९.१९ सेकंदांचा जागतिक विक्रम आहे.धावताना बोल्टचा कमाल वेग (Top Speed) तब्बल ४४.७२ किलोमीटर प्रतितास इतका नोंदवण्यात आला होता. १०० आणि २०० मीटर या दोन्ही प्रकारांमध्ये एकाचवेळी विश्वविक्रम आपल्या नावावर ठेवणारा तो इतिहासातील पहिला धावपटू ठरला.

भारतीय ॲथलेटिक्ससाठी नवा आत्मविश्वास

गुरिंदरवीरच्या या कामगिरीनंतर भारतीय ॲथलेटिक्समध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून भारतात वेगवान धावपटू निर्माण होऊ शकत नाहीत, अशी टीका होत होती. मात्र गुरिंदरवीर आणि अनिमेष यांच्या कामगिरीने भारतीय स्प्रिंटिंगमध्ये (Sprinting) नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा आता क्रीडा वर्तुळात रंगू लागली आहे.


हे देखील वाचा –

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर कॉकरोच पार्टी रस्त्यावर आंदोलन करणार! दीपकेचा इशारा

देवस्थान इनाम कायदा मंदिरांच्या अस्तित्वावर घाला घालणारा आहे ! मंदिर महासंघाच्या सुनील घनवटांचा आरोप

मध्यप्रदेशात नूरजहा आंब्याला व्हीव्हीआयपी सुरक्षा! ५ किलो वजनाच्या एका आंब्याची किंमत आहे तरी किती ?

Web Title:
संबंधित बातम्या