Home / महाराष्ट्र / Raj Thackeray: राज ठाकरे आज पश्चिम मुंबई दौर्‍यावर! नव्या शाखांचे उद्घाटन

Raj Thackeray: राज ठाकरे आज पश्चिम मुंबई दौर्‍यावर! नव्या शाखांचे उद्घाटन

Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या 25 मे रोजी पश्चिम मुंबईचा दौरा करणार असून, पक्ष संघटनाबांधणी...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA


Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या 25 मे रोजी पश्चिम मुंबईचा दौरा करणार असून, पक्ष संघटनाबांधणी आणि कार्यकर्त्यांशी संवाद यावर त्यांचा विशेष भर असणार आहे. अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी आणि वर्सोवा या भागांमध्ये राज ठाकरे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या दौर्‍यादरम्यान राज ठाकरे कार्गो विमानतळ परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण हवाई कामगार सेनेच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. विमानतळ परिसरातील कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्याबरोबरच संघटनेच्या पदाधिकार्‍यांशीही ते संवाद साधणार आहेत. तसेच पश्चिम मुंबईतील काही नव्या मनसे शाखांचे उद्घाटनही राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पश्चिम उपनगरांमध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.


अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त
आ. आदित्य ठाकरे ‘शिवतीर्थ’वर


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस होता. यानिमित्त उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट ‘शिवतीर्थ’वर जाऊन अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीत अमित ठाकरे यांनी केक कापला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर या दोन युवा नेत्यांची ही पहिलीच भेट ठरली. यावेळी शिवतीर्थवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. वाढदिवस साजरा करताना मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजी गाण्यांऐवजी मराठीतच गाणी गाऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आणलेल्या खास केकने सर्वांचे लक्ष वेधले. देशभरात चर्चेत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या केकवर
’नीट हटवा, देश वाचवा’ असा संदेश देण्यात आला होता.

Web Title:
संबंधित बातम्या