Robert Kiyosaki crash warning : ‘रिच डॅड पुअर डॅड’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध गुंतवणूक विश्लेषक रॉबर्ट कियोसाकी यांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा अत्यंत धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर त्यांची एक नवीन पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी जगातील सर्वात मोठ्या आर्थिक घसरणीचा इशारा दिला आहे.
कियोसाकी यांनी अशा प्रकारचा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, आपल्या नवीन पोस्टमध्ये त्यांनी केवळ मंदीचा इशाराच दिला नाही, तर या संकटाचा वापर करून सामान्य लोक कसे श्रीमंत होऊ शकतात, याचा मार्गही दाखवला आहे.
Robert Kiyosaki crash warning : सोने पोहोचणार ९५ लाख रुपयांच्या पार!
रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जिम रिचर्ड्स यांच्या अंदाजाचा हवाला देत सोन्याच्या किमतीबाबत एक मोठा आकडा जाहीर केला आहे:
- सोन्याचा नवा टार्गेट: येत्या काळात सोन्याची किंमत प्रति औंस सुमारे 95 लाख रुपयांपेक्षा जास्त (100,000 डॉलर) पर्यंत पोहोचू शकते.
- सध्याची स्थिती: सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव जवळपास 4.30 लाख रुपये (4,500 डॉलर) प्रति औंसच्या पातळीवर आहे. (१ औंस म्हणजे साधारणपणे 28 ग्रॅम सोने असते).
Crash imminent.
— Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) May 23, 2026
Jim Richard’s calls for gold to get to
$ 100,000
Today gold is at $4,500
I think silver will hit $200 an ounce
Today silver is at $75.
What do you think?
The best investors are able to see the future and take action.
Remember you do not have to be a…
Robert Kiyosaki crash warning : चांदी देखील गाठणार १६,८०० रुपयांचा उच्चांक
सोन्यासोबतच रॉबर्ट कियोसाकी यांनी चांदीच्या किमतीबाबतही मोठी भविष्यवाणी केली असून तिचे मूल्यही भारतीय चलनात स्पष्ट केले आहे:
- चांदीचा नवा टार्गेट: आगामी काळात चांदीची किंमत प्रति औंस सुमारे 16,800 रुपयांवर (200 डॉलर) पोहोचेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
- सध्याची स्थिती: आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी प्रति औंस सुमारे 6,300 रुपयांवर (75 डॉलर) व्यापार करत आहे, पण ती लवकरच आपला नवा उच्चांक गाठेल असा त्यांना विश्वास आहे.
आपल्या या पोस्टच्या शेवटी त्यांनी युजर्सना विचारले आहे की, ‘या किमतींबाबत तुम्हाला काय वाटते?’ हे विशेष उल्लेखनीय आहे की, कियोसाकी हे केवळ सोने-चांदीच नाही, तर बिटकॉइन आणि एथेरियम सारख्या प्रमुख क्रिप्टो मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्लाही नेहमी देत असतात.
Robert Kiyosaki crash warning : आर्थिक मंदीच्या काळातही बनता येईल श्रीमंत
कियोसाकी यांच्या मते, हुशार गुंतवणूकदार हे आगामी संकटाची चाहूल आधीच ओळखून योग्य पावले उचलतात. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “उत्कृष्ट गुंतवणूकदार नेहमी भविष्याचा वेध घेतात आणि त्यानुसार गुंतवणूक करतात. लक्षात ठेवा, येणाऱ्या आर्थिक क्रॅशचे बळी बनणे तुमच्यासाठी अजिबात गरजेचे नाही. उलट, तुम्ही योग्य रणनीती वापरून या मंदीच्या काळात आणखी श्रीमंत होऊ शकता. स्वतःची काळजी घ्या.”
हे देखील वाचा – IPL 2026 Playoff Schedule: आयपीएल प्ले-ऑफचे चित्र स्पष्ट! ‘या’ संघात होणार सामने; पाहा संपूर्ण शेड्युल










