New Honda City Launch: भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये मध्यम बजेट सेडान सेगमेंटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या होंडा कार्सने आपली लोकप्रिय कार ‘होंडा सिटी’ नवीन फेसलिफ्ट अवतारात सादर केली आहे. भारतात या कारची सुरुवातीची किंमत 12 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. पाचव्या पिढीतील (फिफ्थ जनरेशन) होंडा सिटीचे हे दुसरे मोठे अपडेट आहे.
या नव्या मॉडेलमध्ये कारचा पुढचा भाग (फेस) पूर्णपणे बदलण्यात आला असून, आतील भागात अनेक हायटेक फीचर्सचा समावेश केला आहे. मात्र, कारच्या इंजिन आणि मेकॅनिकल्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला हा सेडान सेगमेंटमधील सर्वात जुना आणि यशस्वी ब्रँड आहे.
New Honda City Launch: चार व्हेरिएंट्स आणि किंमत काय?
नवीन होंडा सिटी एकूण चार ट्रिम्स म्हणजेच SV, V, ZX आणि ZX+ मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कारच्या पेट्रोल आणि हायब्रीड मॉडेल्सची सविस्तर किंमत सूची खालीलप्रमाणे आहे:
| व्हेरिएंट (Variant) | 1.5 पेट्रोल मॅन्युअल (MT) | 1.5 पेट्रोल ऑटोमॅटिक (CVT) | 1.5 स्ट्रॉन्ग-हायब्रीड (e:HEV) |
| SV | 12.00 लाख रुपये | उपलब्ध नाही | उपलब्ध नाही |
| V | 13.30 लाख रुपये | 14.30 लाख रुपये | उपलब्ध नाही |
| ZX | 15.26 लाख रुपये | 16.26 लाख रुपये | उपलब्ध नाही |
| ZX+ | 16.15 लाख रुपये | 17.15 लाख रुपये | 21.00 लाख रुपये |
कारची सुरुवातीची किंमत आधीसारखीच असली, तरी टॉप पेट्रोल-सीव्हीटी मॉडेलची किंमत 1.08 लाख रुपयांनी वाढली आहे. तर हायब्रीड मॉडेलच्या किमतीत 1 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
New Honda City Launch: बाह्य डिझाईनमध्ये झालेत ‘हे’ मोठे बदल
होंडाने या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कारच्या बाहेरील लुकला अधिक आकर्षक बनवले आहे:
- नवीन फ्रंट ग्रिल: कारला आता हनीकॉम्ब पॅटर्नची नवीन ग्रिल देण्यात आली आहे. जुन्या मॉडेलमधील क्रोम फिनिशिंग काढून त्याऐवजी बॉडी कलर पॅनल देण्यात आला आहे.
- एलईडी लाईट्स: नवीन स्लीक हेडलॅम्प्ससह दोन भागांमध्ये विभागलेले एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत, जे एका लाईट बारने जोडलेले आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी प्रकाशाचा थ्रो अधिक लांब आणि रुंद मिळतो.
- बंपर आणि अलॉय व्हील्स: कारच्या दोन्ही बाजूंना त्रिकोणी आकाराचे एअर इनटेक्स आणि नवीन डिझाईनचा बंपर दिला आहे. तसेच बाजूंनी पाहिल्यास १६ इंचाचे नवीन ड्युअल-टोन अलॉय व्हील्स लक्ष वेधून घेतात.
- नवे रंगांचे पर्याय: या कारमध्ये आता ‘क्रिस्टल ब्लॅक पर्ल’ हा नवीन रंगाचा पर्याय जोडण्यात आला आहे. याशिवाय रेड, ब्लू, ग्रे, सिल्व्हर आणि व्हाईट हे पूर्वीचे ५ रंगही उपलब्ध राहतील.
New Honda City Launch: इंटेरिअर आणि हायटेक फीचर्सचा भरणा
कारच्या आतमध्ये खूप मोठे बदल नसले तरी काही अत्यंत महत्त्वाचे फीचर्स जोडले गेले आहेत. आता कारमध्ये आधीपेक्षा मोठी 10.1 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते, जी डॅशबोर्डवर थोडी वरच्या बाजूने दिसते.
- कम्फर्ट आणि सुरक्षा: उन्हाळ्याच्या दिवसांसाठी यात पहिल्यांदाच ‘व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स’ (थंड हवा देणाऱ्या सीट) आणि सुरक्षेसाठी ३६० डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे.
- अतिरिक्त फीचर्स: यात ८ स्पीकरची साऊंड सिस्टम, अॅम्बियंट लायटिंग, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, वायरलेस चार्जिंग, सनरूफ, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि ६ एअरबॅग्ज मिळतात. तसेच लेन-वॉच कॅमेरा आणि लेव्हल २ अॅडास (ADAS) ही आधुनिक सुरक्षा प्रणाली देखील कायम ठेवण्यात आली आहे.
New Honda City Launch: दमदार इंजिन आणि मायलेज
इंजिनच्या बाबतीत कार जुन्याच पर्यायांसह बाजारात आली आहे:
1.5-लिटर स्ट्रॉन्ग-हायब्रीड इंजिन: हे इंजिन ई-सीव्हीटी गिअरबॉक्ससह येते, जे 126hp ची पॉवर निर्माण करते. कंपनीचा दावा आहे की हायब्रीड मॉडेलमध्ये तब्बल 27.26kpl इतके बंपर मायलेज मिळते. याशिवाय कंपनीने हायब्रीड घटकांवर ५ वर्षांची नवीन वॉरंटी जाहीर केली आहे.
1.5-लिटर पेट्रोल इंजिन: हे इंजिन 121hp ची पॉवर आणि 145Nm चा टॉर्क जनरेट करते. यात ६-स्पीड मॅन्युअल आणि ७-स्टेप सीव्हीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.
हे देखील वाचा – IPL 2026 Playoff Schedule: आयपीएल प्ले-ऑफचे चित्र स्पष्ट! ‘या’ संघात होणार सामने; पाहा संपूर्ण शेड्युल










