Home / क्रीडा / FIFA World Cup 2026 Schedule: फुटबॉल महाकुंभचा थरार! इतिहासात पहिल्यांदाच 48 संघ आमनेसामने; कधी सुरू होणार सामने?

FIFA World Cup 2026 Schedule: फुटबॉल महाकुंभचा थरार! इतिहासात पहिल्यांदाच 48 संघ आमनेसामने; कधी सुरू होणार सामने?

FIFA World Cup 2026 Schedule: फुटबॉल चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून २३ व्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. यंदाचा...

By: Team Navakal
FIFA World Cup 2026 Schedule: फुटबॉल महाकुंभचा थरार! इतिहासात पहिल्यांदाच 48 संघ आमनेसामने; कधी सुरू होणार सामने?
Social + WhatsApp CTA

FIFA World Cup 2026 Schedule: फुटबॉल चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून २३ व्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. यंदाचा महामुकाबला ११ जून २०२६ ते १९ जुलै २०२६ या कालावधीत खेळवला जाणार आहे. फुटबॉलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की या स्पर्धेचे आयोजन तीन देश मिळून करत आहेत.

अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांमधील १६ शहरांमध्ये हे सामने रंगणार आहेत. यामध्ये अमेरिकेतील ११, मेक्सिकोतील ३ आणि कॅनडातील २ शहरांचा समावेश आहे. जगातील या सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सवासाठी सर्व देशांमधील चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

FIFA World Cup 2026 Schedule: बदलेला नवा फॉरमॅट आणि वाढलेले संघ

यंदाच्या विश्वचषकात केवळ यजमान देशांचीच संख्या वाढलेली नाही, तर स्पर्धेचा फॉरमॅटही पूर्णपणे बदलला आहे. यावेळची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • ४८ संघांचा सहभाग: पूर्वी या स्पर्धेत ३२ संघ खेळायचे, परंतु यंदा संघसंख्या वाढवून ४८ करण्यात आली आहे.
  • १२ ग्रुप्समध्ये विभागणी: या ४८ देशांची एकूण १२ ग्रुप्समध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक ग्रुपमध्ये ४ संघांचा समावेश आहे.
  • लीग स्टेजमध्ये ७२ सामने: केवळ ग्रुप स्टेजमध्येच प्रेक्षकांना ७२ सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे.

असे रंगणार बाद फेरीचे सामने

लीग सामन्यानंतर सुरू होणाऱ्या बाद फेरीच्या (नॉकआऊट) महत्त्वाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत:

  • राऊंड ऑफ ३२: २८ जून २०२६ पासून बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल.
  • राऊंड ऑफ १६: ४ जुलै रोजी उप-उपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील.
  • क्वार्टर फायनल (उपांत्यपूर्व): ९ जुलैपासून अंतिम ४ संघांसाठी लढाई रंगेल.
  • सेमीफायनल (उपांत्य): १४ जुलै आणि १५ जुलै रोजी अंतिम फेरीचे दोन दावेदार निश्चित होतील.
  • तिसऱ्या स्थानासाठी लढत: १८ जुलै रोजी ब्रॉन्झ मेडलसाठी सामना खेळवला जाईल.

FIFA World Cup 2026 Schedule: महाअंतिम मुकाबला

स्पर्धेचा सर्वात मोठा आणि अंतिम सामना १९ जुलै २०२६ रोजी खेळवला जाईल. न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर रंगणाऱ्या या १०४ व्या सामन्यात जगाला नवा फुटबॉल चॅम्पियन मिळेल.

FIFA World Cup 2026 Schedule: फिफा विश्वचषक २०२६ चे सर्व १२ ग्रुप्स

ग्रुप L: इंग्लंड, क्रोएशिया, घाना, पनामा

ग्रुप A: मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, चेकिया

ग्रुप B: कॅनडा, बोस्निया आणि हर्झगोव्हिना, कतार, स्वित्झर्लंड

ग्रुप C: ब्राझील, मोरोक्को, हैती, स्कॉटलंड

ग्रुप D: अमेरिका, पॅराग्वे, ऑस्ट्रेलिया, तुर्किये

ग्रुप E: जर्मनी, कुरासाओ, कोटे डी आयव्हरी, इक्वेडोर

ग्रुप F: नेदरलँड्स, जपान, स्वीडन, ट्युनिशिया

ग्रुप G: बेल्जियम, इजिप्त, इराण, न्यूझीलंड

ग्रुप H: स्पेन, काबो वर्दे, सौदी अरेबिया, उरुग्वे

ग्रुप I: फ्रान्स, सेनेगल, इराक, नॉर्वे

ग्रुप J: अर्जेंटिना, अल्जेरिया, ऑस्ट्रिया, जॉर्डन

ग्रुप K: पोर्तुगाल, काँगो डीआर, उझबेकिस्तान, कोलंबिया

हे देखील वाचा – IPL 2026 Playoff Schedule: आयपीएल प्ले-ऑफचे चित्र स्पष्ट! ‘या’ संघात होणार सामने; पाहा संपूर्ण शेड्युल

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या