PM Kisan 23rd Installment: देशातील शेतकर्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी केंद्र सरकारकडून चालवल्या जाणार्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या २३ व्या हप्त्याची तारीख आता जवळ येत आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकरी या आगामी हप्त्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च 2026 रोजी आसाममधील गुवाहाटी येथून २२ वा हप्ता जारी केला होता.
PM Kisan 23rd Installment: २३ वा हप्ता कधी जमा होणार?
आतापर्यंतच्या हप्त्यांच्या वितरणाचा पॅटर्न पाहता, पीएम किसान योजनेचा २3 वा हप्ता जून ते जुलै 2026 दरम्यान शेतकर्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारकडून दर 4 महिन्यांनी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीद्वारे ही रक्कम पाठवली जाते. जरी अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख आणि वेळेची घोषणा झालेली नसली, तरी शेतकर्यांनी पुढील हप्त्यासाठी आतापासूनच आपली तयारी पूर्ण ठेवणे आवश्यक आहे.
PM Kisan 23rd Installment: २,००० रुपये मिळवण्यासाठी ‘ई-केवायसी’ अनिवार्य
जर तुम्हाला २3 व्या हप्त्याचे 2,000 रुपये कोणत्याही अडचणीशिवाय हवे असतील, तर ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकर्यांचे केवायसी पूर्ण नसेल किंवा बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल, त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
शेतकरी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी खालील ३ सोपे पर्याय उपलब्ध आहेत:
- ओटीपी आधारित ई-केवायसी: शेतकरी पीएम किसान पोर्टल किंवा मोबाईल अॅपवर जाऊन आपल्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी मागवून ही प्रक्रिया करू शकतात.
- बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी: शेतकरी आपल्या जवळच्या सीएससी (Common Service Centres) किंवा राज्य सेवा केंद्रावर जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन केवायसी करू शकतात.
- चेहरा ओळखून केवायसी (फेस ऑथेंटिकेशन): पीएम किसान मोबाईल अॅपवर चेहऱ्याचा फोटो स्कॅन करून ई-केवायसी करण्याचा आधुनिक पर्यायही लाखो शेतकरी वापरत आहेत.
PM Kisan 23rd Installment: असे तपासा तुमचे नाव आणि स्टेटस
तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही, हे तपासण्यासाठी तुम्ही खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमचे स्टेटस पाहू शकता:
स्टेप 1: सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला (pmkisan.gov.in) भेट द्या.
स्टेप 2: मुख्य पानावर असलेल्या ‘बेनिफिशियरी स्टेटस’ (Beneficiary Status) या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3: त्यानंतर तुमचा नोंदणीकृत तपशील किंवा खाते क्रमांक योग्य ठिकाणी भरा.
स्टेप 4: माहिती भरल्यानंतर ‘गेट डेटा’ (Get Data) या बटनावर क्लिक करा.
स्टेप 5: आता तुमच्या स्क्रीनवर पेमेंटचे स्टेटस आणि लाभार्थी यादीतील तुमचे नाव दिसून येईल.
हे देखील वाचा – LPG Cylinder New Rules: गॅस ग्राहकांसाठी नवीन नियम लागू! ‘या’ तारखेपर्यंत PNG न घेतल्यास LPG कनेक्शन होणार बंद











