Home / महाराष्ट्र / Pune Alcohol Deaths: पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूचे तांडव; आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, तोंडाला फेस येऊन नागरिकांनी सोडला प्राण

Pune Alcohol Deaths: पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूचे तांडव; आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, तोंडाला फेस येऊन नागरिकांनी सोडला प्राण

Pune Alcohol Deaths: पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. विषारी स्पिरिटयुक्त दारू...

By: Team Navakal
Pune Alcohol Deaths: पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूचे तांडव; आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, तोंडाला फेस येऊन नागरिकांनी सोडला प्राण
Social + WhatsApp CTA

Pune Alcohol Deaths: पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. विषारी स्पिरिटयुक्त दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिकांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी मुख्य आरोपी आणि सराईत दारू विक्रेता योगेश वानखेडे याला बेड्या ठोकल्या आहेत. वानखेडेविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने बनवलेली ही जीवघेणी दारू वेगवेगळ्या भागात विकली गेली होती.

Pune Alcohol Deaths: कोणत्या भागात किती बळी?

दारू प्यायलेल्या नागरिकांच्या तोंडाला फेस आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. विविध भागातील मृतांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • पिंपरी-चिंचवड (दापोडी आणि फुगेवाडी परिसर): येथे सर्वाधिक 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • पुणे (काळे पडळ परिसर): या भागात 3 जणांना आपला जीव गमावावा लागला.
  • पुणे (हडपसर परिसर): येथे 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या काही जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Pune Alcohol Deaths: स्थानिकांचे आरोप आणि पोलिसांचा वेगळाच दावा

दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी झालेल्या मृत्यूंमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. परिसरात अवैध हातभट्टीची विषारी दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणावरून आता राजकारणही तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यावर वेगळा दावा केला आहे. पोलिसांच्या मते, मृत पावलेल्या 8 पैकी 5 नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाला आहे. मात्र, या सर्वांना मृत्यूपूर्वी तीव्र चक्कर आली होती, अशी माहिती स्वतः पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

वैद्यकीय अहवालाकडे सर्वांचे लक्ष

मृत्यू नेमका विषारी दारूमुळे झाला की इतर कोणत्या आजाराने, याचा अधिकृत खुलासा अजून झालेला नाही. मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अंतिम वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. तोपर्यंत फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील नागरिकांमधील संभ्रम आणि भीती कायम आहे.

हे देखील वाचा – NEET UG Re Exam 2026: नीट पेपर लीक रोखण्यासाठी आता थेट वायुसेनेची मदत! 21 जूनच्या परीक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या