Home / लेख / 6 एयरबॅग्स आणि 360डिग्री कॅमेऱ्यासह नवीन Tata Tiago Facelift लाँच! पाहा किंमत अन् फीचर्स

6 एयरबॅग्स आणि 360डिग्री कॅमेऱ्यासह नवीन Tata Tiago Facelift लाँच! पाहा किंमत अन् फीचर्स

2026 Tata Tiago Facelift Launch: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा मोटर्सने आपली सर्वाधिक पसंती मिळवणारी बजेट कार ‘टाटा टियागो’चे...

By: Team Navakal
6 एयरबॅग्स आणि 360डिग्री कॅमेऱ्यासह नवीन Tata Tiago Facelift लाँच! पाहा किंमत अन् फीचर्स
Social + WhatsApp CTA

2026 Tata Tiago Facelift Launch: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा मोटर्सने आपली सर्वाधिक पसंती मिळवणारी बजेट कार ‘टाटा टियागो’चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल अखेर बाजारात उतरवले आहे. 2026 Tata Tiago Facelift ची सुरुवातीची किंमत 4.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

कंपनीने या कारच्या बाह्य रचनेत (एक्सटीरियर) आणि अंतर्गत वैशिष्ट्यांमध्ये (इंटीरियर) अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे ही कार अधिक आधुनिक आणि आकर्षक दिसते. मात्र, कारच्या इंजिन आणि मेकॅनिकल्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

2026 Tata Tiago Facelift Launch: एकूण ६ व्हेरिएंट्स आणि सीएनजीचा पर्याय

नवीन टियागो फेसलिफ्ट ग्राहकांसाठी पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही कार एकूण 6 व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे.

  • मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रिम्स: पेट्रोल आणि सीएनजी मॅन्युअल प्रकारांव्यतिरिक्त कंपनीने Pure, Pure+, Pure+A, Creative आणि Creative+ ट्रिम्समध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही दिला आहे.
  • किंमत श्रेणी: कारच्या बेस-स्पेक ‘स्मार्ट’ ट्रिमची किंमत 4.69 लाख रुपये आहे, तर टॉप-स्पेक ‘क्रिएटिव्ह+’ व्हेरिएंटची किंमत 7.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

पाहा संपूर्ण व्हेरिएंटनुसार किंमत:

व्हेरिएंटपेट्रोल मॅन्युअल (किंमत रुपयात)सीएनजी मॅन्युअल (किंमत रुपयात)
Smart4.69 लाख5.79 लाख
Pure5.49 लाख6.49 लाख
Pure+5.99 लाख6.99 लाख
Pure+ A6.49 लाख7.49 लाख
Creative6.99 लाख7.99 लाख
Creative+7.29 लाख

2026 Tata Tiago Facelift Launch: लूक आणि डिझाईनमध्ये काय बदलले?

हॅचबॅक सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी टाटाने टियागोच्या लूकमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत:

  • फ्रंट लूक: कारच्या समोरच्या भागात नवीन डिझाईनच्या हेडलाईट्ससह आयब्रो स्टाईलचे नवीन एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. तसेच मोठी काळ्या रंगाची ग्रिल कारला स्पोर्टी लूक देते.
  • साईड आणि रिअर प्रोफाईल: कारला अधिक आकर्षक बनवण्यासाठी यात नवीन 15 इंचाचे अलॉय व्हील्स जोडण्यात आले आहेत. मागील बाजूला कनेक्टेड स्टाईलची नवीन टेललाईट आहे, ज्यामध्ये व्हर्टिकल स्लॅट्स दिले आहेत. याशिवाय मागील बंपरचे डिझाईनही पूर्णपणे बदलण्यात आले आहे.

2026 Tata Tiago Facelift Launch: अत्याधुनिक इंटीरियर आणि फीचर्स

कारच्या केबिनमध्ये आता दोन मोठ्या फ्री-फ्लोटिंग स्क्रीन्स पाहायला मिळतात. जुन्या मॉडेलमधील एलसीडी स्क्रीन बदलून आता पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, तर दुसरी स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम म्हणून काम करते. याशिवाय कारमध्ये 37 कनेक्टेड कार फीचर्स, ऑटोमॅटिक हेडलाईट्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि सीएनजी मॉडेलसाठी थेट स्टार्ट सिस्टीम मिळते.

सुरक्षेच्या बाबतीत कमालीची सुधारणा

टाटा मोटर्स नेहमीच आपल्या गाड्यांच्या सुरक्षेसाठी ओळखली जाते आणि नवीन टियागोमध्येही हे स्पष्टपणे दिसते. बजेट कार असूनही कंपनीने यात सुरक्षेची तगडी वैशिष्ट्ये दिली आहेत:

इतर सेफ्टी फीचर्स: यात इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, मजबूत रोल केज, कॉर्नरिंग स्टॅबिलिटी कंट्रोल आणि अपघातानंतर मदतीसाठी पोस्ट-क्रॅश एसओएस (SOS) सारखे प्रीमियम फीचर्स मिळतात.

६ एअरबॅग्स: सर्व व्हेरिएंट्समध्ये आता स्टँडर्ड म्हणून 6 एअरबॅग्स मिळतील.

३६० डिग्री कॅमेरा: सुरक्षित ड्रायव्हिंग आणि पार्किंगसाठी ब्लाइंड स्पॉट डिटेक्शनसह 360-डिग्री कॅमेरा दिला आहे.

हे देखील वाचा – IPL 2026 Final: किंग कोहली vs प्रिन्स गिल! RCB रचणार इतिहास की GT मारणार बाजी? कधी व कुठे पाहता येईल फायनल? वाचा

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या