PM Ujjwala Yojana: पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या देशातील कोट्यवधी सर्वसामान्य कुटुंबांसाठी केंद्र सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा आणि काहीसा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने या योजनेअंतर्गत वर्षाला मिळणाऱ्या अनुदानित म्हणजेच सबसिडीच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या संख्येत मोठी कपात केली आहे.
आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात केवळ 4 सिलेंडरवरच प्रत्येकी 300 रुपयांचे अनुदान दिले जाईल. यापूर्वी ही मर्यादा ९ सिलेंडरची होती. पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या नवीन बदलाला दुजोरा दिला असून, नव्या नियमामुळे आता एका कुटुंबाला वर्षाला जास्तीत जास्त 1,200 रुपयांचा थेट आर्थिक फायदा मिळू शकणार आहे.
PM Ujjwala Yojana: २०१६ पासून कसा बदलत गेला नियम?
मे 2016 मध्ये गरिबांना मोफत गॅस देण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत यातील नियमांमध्ये अनेक बदल झाले आहेत:
- सुरुवातीचा नियम: योजना सुरू झाली तेव्हा वर्षाला तब्बल 12 सिलेंडरवर अनुदान दिले जात होते. त्यानंतर मे 2022 मध्ये 200 रुपयांचे अनुदान निश्चित करण्यात आले.
- अनुदानात वाढ: ऑक्टोबर 2023 मध्ये अनुदानाचा हा आकडा 200 रुपयांवरून वाढवून 300 रुपये करण्यात आला.
- २०२५ मधील पहिली कपात: ऑगस्ट 2025 मध्ये सरकारने पहिला मोठा निर्णय घेत १२ सिलेंडरची मर्यादा कमी करून ती वर्षभरात 9 सिलेंडरवर आणली होती.
- आताची नवीन कपात: आता 2026 मध्ये सरकारने यात पुन्हा कपात करत ही संख्या वार्षिक फक्त 4 सिलेंडरवर मर्यादित केली आहे.
PM Ujjwala Yojana: सिलेंडर कपातीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील संकट
हा निर्णय घेण्यामागे जागतिक पातळीवरील आर्थिक समीकरणे कारणीभूत ठरली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एलपीजीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. विशेषतः हॉरमुझ सामुद्रधुनीच्या परिसरातील तणावामुळे सौदी कंत्राटी किमती गगनाला भिडल्या आहेत.
या आंतरराष्ट्रीय संकटामुळे सध्या एका घरगुती गॅस सिलेंडरची खरी किंमत 1,600 रुपयांच्या पार गेली आहे. परिणामी, सरकारी तेल कंपन्यांना प्रति सिलेंडर तब्बल 700 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यापूर्वी सरकारने २०२३ आणि २०२४ या आर्थिक वर्षात तेल कंपन्यांचे हे नुकसान भरून काढण्यासाठी 52,000 कोटी रुपयांची मोठी बजेट मदत दिली होती.
PM Ujjwala Yojana: सध्या काय आहेत गॅस सिलेंडरचे दर?
पेट्रोलियम मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुदान मर्यादित केले असले तरी ग्राहकांना अप्रत्यक्षपणे मोठी मदत मिळत आहे:
उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी दर: उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना या ९४२ रुपयांवर आणखी ३०० रुपयांची थेट सबसिडी मिळते. त्यामुळे त्यांना हा सिलेंडर केवळ 642 रुपयांना पडतो. मात्र, हा ६४२ रुपयांचा दर आता वर्षातील पहिल्या फक्त ४ सिलेंडरच्या रिफिलसाठीच लागू राहील. त्यानंतरच्या सिलेंडरसाठी पूर्ण किंमत मोजावी लागेल.
सामान्य ग्राहकांसाठी दर: देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर सामान्य ग्राहकांसाठी 942 रुपयांना मिळतो.
हे देखील वाचा – Vizag Steel Plant Blast: क्रेन निकामी झाली अन् १६०० अंशांचे उकळते लोखंड थेट कामगारांवर कोसळले; थरकाप उडवणारा घटनाक्रम आला समोर










