Home / लेख / Dubai Road Accident: दुबईत भीषण रस्ता अपघात, 7 भारतीय कामगारांचा मृत्यू; मरण पावलेले सर्व मजूर

Dubai Road Accident: दुबईत भीषण रस्ता अपघात, 7 भारतीय कामगारांचा मृत्यू; मरण पावलेले सर्व मजूर

Dubai Road Accident: परदेशात जाऊन दोन पैसे कमवण्याचे आणि कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय कामगारांवर दुबईत मोठा काळाचा...

By: Team Navakal
Dubai Road Accident: दुबईत भीषण रस्ता अपघात, 7 भारतीय कामगारांचा मृत्यू; मरण पावलेले सर्व मजूर
Social + WhatsApp CTA

Dubai Road Accident: परदेशात जाऊन दोन पैसे कमवण्याचे आणि कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय कामगारांवर दुबईत मोठा काळाचा घाला आला आहे. दुबईतील प्रसिद्ध अमिरात रोडवर एका मिनीबस आणि ट्रकचा अत्यंत भीषण अपघात झाला.

या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात एकूण 7 लोकांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात प्राण गवावे लागलेले सर्व मृत हे भारतीय वंशाचे मजूर आणि कामगार आहेत.

Dubai Road Accident: कसा झाला हा भीषण अपघात?

दुबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे संचालक ब्रिगेडियर जुमा सालेम बिन सुवैदान यांनी अपघाताच्या कारणांचा प्राथमिक अहवाल जारी केला आहे:

  • रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेला ट्रक: महामार्गावरून जात असताना एका मोठ्या ट्रकमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडामुळे चालकाने तो ट्रक रस्त्याच्या कडेला घेण्याऐवजी हायवेच्या अगदी मध्यभागीच उभा केला होता.
  • बस चालकाचा निष्काळजीपणा: याच वेळी मागून कामगारांना घेऊन येणाऱ्या मिनीबसच्या चालकाचे रस्त्याकडे लक्ष नव्हते. वेगात असलेल्या या बस चालकाला समोर उभा असलेला ट्रक वेळेत दिसला नाही.
  • मागून जोरात धडक: चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मिनीबसने रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रकला मागून अत्यंत जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

भारतीय दूतावासाकडून तातडीची मदत आणि दुःख व्यक्त

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच दुबईतील भारतीय दूतावासाने (कन्सुलट) तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) पोस्ट करत लिहिले की, “दुबईतील या रस्ता अपघातात भारतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत.”

भारतीय अधिकाऱ्यांच्या एका पथकाने तातडीने स्थानिक रुग्णालयाला भेट दिली, जिथे जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत. जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत मिळावी यासाठी भारतीय दूतावास दुबईतील स्थानिक प्रशासन आणि रुग्णालय व्यवस्थापनाशी सतत संपर्कात असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहे.

तपास अजूनही सुरू

अपघाताच्या वेळी या मिनीबसमध्ये एकूण किती मजूर प्रवास करत होते, याबाबतची अचूक आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. दुबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर मृतांची नावे आणि पुढील तपशील अधिकृतपणे जाहीर केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा – Vizag Steel Plant Blast: क्रेन निकामी झाली अन् १६०० अंशांचे उकळते लोखंड थेट कामगारांवर कोसळले; थरकाप उडवणारा घटनाक्रम आला समोर

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या