Home / महाराष्ट्र / Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलाजवळ मध्यरात्री सिमेंट मिक्सर पलटी होऊन भीषण अपघात; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलाजवळ मध्यरात्री सिमेंट मिक्सर पलटी होऊन भीषण अपघात; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

Navale Bridge Accident : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलाजवळ मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात...

By: Team Navakal
Navale Bridge Accident :
Social + WhatsApp CTA

Navale Bridge Accident : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलाजवळ मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला. एका भरधाव सिमेंट काँक्रीट मिक्सर टँकरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अवजड टँकर थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीवर उलटला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये संबंधित दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे नवले पूल परिसर पुन्हा एकदा रक्ताने माखला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पुणे वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकर दुचाकीवर उलटल्यामुळे आणि रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यामुळे परिसरात काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने तो अवजड सिमेंट मिक्सर रस्त्याच्या बाजूला हटवला आणि विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा पूर्ववत केली. सिमेंट टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा टँकर थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीवर उलटला असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या