Home / लेख / BSNL Cheapest Prepaid Plan: Airtel-Jio विसरा! सरकारी कंपनी BSNL चा ग्राहकांसाठी खास प्लॅन, 210GB डेटासह कॉलिंग फ्री

BSNL Cheapest Prepaid Plan: Airtel-Jio विसरा! सरकारी कंपनी BSNL चा ग्राहकांसाठी खास प्लॅन, 210GB डेटासह कॉलिंग फ्री

BSNL Cheapest Prepaid Plan: सरकारी क्षेत्रातील नामांकित टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या कोट्यवधी युझर्ससाठी बाजारपेठेत एक अत्यंत किफायतशीर आणि ऑल-इन-वन प्रीपेड...

By: Team Navakal
BSNL Cheapest Prepaid Plan: Airtel-Jio विसरा! सरकारी कंपनी BSNL चा ग्राहकांसाठी खास प्लॅन, 210GB डेटासह कॉलिंग फ्री
Social + WhatsApp CTA

BSNL Cheapest Prepaid Plan: सरकारी क्षेत्रातील नामांकित टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या कोट्यवधी युझर्ससाठी बाजारपेठेत एक अत्यंत किफायतशीर आणि ऑल-इन-वन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. खाजगी कंपन्यांच्या वाढत्या रिचार्ज दरांच्या काळात बीएसएनएलचा हा 599 रुपयांचा प्लॅन ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना केवळ लांबलचक व्हॅलिडिटीच मिळत नाही, तर इंटरनेट वापरण्यासाठी प्रचंड प्रमाणात डेटाही दिला जात आहे.

कंपनीने या बजेट रिचार्जला आपल्या युझर्ससाठी एक सर्वोत्तम पर्याय म्हणून प्रमोट करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः जे युझर्स जास्त इंटरनेट वापरतात किंवा घरून काम करतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन रिचार्जच्या वारंवार होणाऱ्या कटकटीतून सुटका करणारा ठरणार आहे.

५९९ रुपयांच्या प्लॅनचे फायदे आणि धमाकेदार ऑफर्स:

या रिचार्ज पॅकमध्ये युझर्सला मिळणारे फायदे खालीलप्रमाणे सविस्तर आहेत:

  • रोज ३GB हाय-स्पीड डेटा: या प्लॅनमध्ये युझर्सला दररोज 3GB हाय-स्पीड डेटा वापरता येईल. म्हणजेच संपूर्ण ७० दिवसांच्या कालावधीत ग्राहकांना एकूण 210GB डेटा मिळणार आहे.
  • इंटरनेट कधीही पूर्ण बंद होणार नाही: जर दिवसाची 3GB डेटा मर्यादा संपली, तरीही इंटरनेट पूर्णपणे बंद होत नाही. डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होऊन 40 kbps इतका होतो, ज्यामुळे तुमचे महत्त्वाचे मेसेज आणि बेसिक कनेक्टिव्हिटी सुरू राहते.
  • अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री SMS: डेटासोबतच ग्राहकांना देशातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, दररोज 100 मोफत एसएमएस पाठवण्याची सोयही यामध्ये समाविष्ट आहे.

बार-बार रिचार्ज करण्याची टेन्शन संपली; कोणासाठी आहे फायदेशीर?

या प्रीपेड प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची 70 दिवसांची प्रदीर्घ वैधता आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या रिचार्जमुळे ग्राहकांना दरमहा दुकान गाठण्याची किंवा ऑनलाईन पेमेंट करण्याची गरज पडत नाही.

हा प्लॅन प्रामुख्याने ऑनलाईन क्लासेस अटेंड करणारे विद्यार्थी, वर्क फ्रॉम होम करणारे व्यावसायिक आणि सोशल मीडिया तसेच व्हिडिओ स्ट्रीमिंगचा भरपूर वापर करणाऱ्या युझर्समध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. जर तुम्हाला कमी खर्चात कॉलिंग, मेसेजिंग आणि भरपूर डेटा एकाच रिचार्जमध्ये हवा असेल, तर हा एक उत्तम पर्याय आहे.

हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या