Home / लेख / Best Mileage Bikes: बाईक खरेदी करायचीये? भारतात मिळतात ‘या’ 5 सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स

Best Mileage Bikes: बाईक खरेदी करायचीये? भारतात मिळतात ‘या’ 5 सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स

Best Mileage Bikes: भारतीय दुचाकी बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. देशात प्रामुख्याने अशा गाड्यांना सर्वाधिक पसंती दिली...

By: Team Navakal
Best Mileage Bikes: बाईक खरेदी करायचीये? भारतात मिळतात 'या' 5 सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्स
Social + WhatsApp CTA

Best Mileage Bikes: भारतीय दुचाकी बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. देशात प्रामुख्याने अशा गाड्यांना सर्वाधिक पसंती दिली जाते ज्यांची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी असेल आणि ज्यांचा मायलेज दमदार असेल. देशातील बदलत्या करप्रणालीनुसार जीएसटी 2.0 लागू झाल्यापासून दुचाकी वाहनांच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे.

जर तुम्हीही दैनंदिन वापरासाठी किंवा ऑफिसला येण्या-जाण्यासाठी एक नवी, मजबूत आणि स्वस्त बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात उपलब्ध असलेल्या ५ सर्वोत्तम बजेट गाड्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

१. TVS Sport ES: देशातील सर्वात स्वस्त बाईक

टीव्हीएस कंपनीची ही बाईक सध्या भारतीय बाजारपेठेतील सर्वात कमी किमतीची मोटरसायकल बनली आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत अवघी 55100 रुपये आहे.

  • इंजिन आणि परफॉर्मन्स: साल 2020 मध्ये बीएस-६ नियम लागू झाल्यानंतर कंपनीने या गाडीत मोठा बदल केला होता. यात 100 सीसी ऐवजी आता 109.7cc चे इंजिन मिळते, जे फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानाने सज्ज आहे. हे इंजिन 8.3hp ची पॉवर आणि 8.7nm चा टॉर्क जनरेट करते.
  • मायलेज: ही बाईक प्रति लीटर तब्बल 70 ते 80 किमीपर्यंतचा उत्कृष्ट मायलेज देते.

२. Hero HF Deluxe: ऑल-ब्लॅक मॉडेलची क्रेझ

हिरोची ही बाईक बाजारात विविध प्रकारच्या व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. मात्र, कंपनीने याच्या ‘ऑल-ब्लॅक’ मॉडेलची एक्स-शोरूम किंमत फक्त 59477 रुपये ठेवली आहे. इतर मॉडेल्समध्ये केवळ रंग आणि स्टिकर्सचा फरक पाहायला मिळतो. या गाडीत 97.2cc चे इंजिन असून ते अत्यंत विश्वासाहार्य मानले जाते.

३. Hero HF 100: कमी बजेटमध्ये उत्तम पर्याय

हिरो कंपनी नेहमीच कमी किमतीत जास्त व्हॅल्यू देण्यासाठी ओळखली जाते. या यादीतील इतर गाड्यांच्या तुलनेत ही एक अत्यंत किफायतशीर बाईक आहे.

  • किंमत आणि इंजिन: याची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 59839 रुपये आहे. यात 97.2cc चे इंजिन देण्यात आले असून ते 7.9hp ची पॉवर आणि 8.05nm चा टॉर्क जनरेट करते. यात 4-स्पीड गियरबॉक्सचा सपोर्ट मिळतो.

४. Bajaj Platina 100: आरामदायी प्रवासासाठी प्रसिद्ध

जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर बजाज प्लेटिनाची किंमत देखील बरीच कमी झाली आहे. आता या बाईकची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 65103 रुपये झाली आहे. या मोटरसायकलमध्ये 100cc चे इंजिन देण्यात आले असून ते 7.9hp ची पॉवर आणि 8.3nm चा टॉर्क देते. खराब रस्त्यांवरही उत्तम आराम देण्यासाठी ही गाडी ओळखली जाते.

५. Honda Shine 100: होंडाची सर्वात स्वस्त बाईक

कमी बजेटमध्ये ज्यांना अत्यंत स्टाईलिश लुक आणि होंडाचा इंजिन भरोसा हवा आहे, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही कंपनीची भारतातील सर्वात स्वस्त बाईक आहे.

किंमत आणि वैशिष्ट्ये: याची एक्स-शोरूम किंमत 65393 रुपये आहे. यामध्ये 98.98cc चे इंजिन देण्यात आले असून ते 7.38hp ची पॉवर आणि 8.40nm चा टॉर्क जनरेट करते. ही बाईक वजनाने हलकी आणि चालवण्यास अतिशय सोपी आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या