Home / लेख / Lava ने लाँच केले सर्वात स्वस्त इयरबड्स; 10 मिनिटांच्या चार्जिंगवर चालणार 3 तास; पाहा किंमत

Lava ने लाँच केले सर्वात स्वस्त इयरबड्स; 10 मिनिटांच्या चार्जिंगवर चालणार 3 तास; पाहा किंमत

Lava Probuds T51 Launch: भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी लावाने आपल्या अ‍ॅक्सेसरीज पोर्टफोलिओचा विस्तार करत ग्राहकांसाठी दोन नवीन ऑडिओ गॅजेट्स बाजारात...

By: Team Navakal
Lava ने लाँच केले सर्वात स्वस्त इयरबड्स; 10 मिनिटांच्या चार्जिंगवर चालणार 3 तास; पाहा किंमत
Social + WhatsApp CTA

Lava Probuds T51 Launch: भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी लावाने आपल्या अ‍ॅक्सेसरीज पोर्टफोलिओचा विस्तार करत ग्राहकांसाठी दोन नवीन ऑडिओ गॅजेट्स बाजारात आणले आहेत. कंपनीने आपली नवीन प्रो सीरिज सादर करत Lava Probuds T51 Launch आणि Xscape 13° Neckband भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केले आहेत.

हे दोन्ही ऑडिओ प्रोडक्ट्स सध्या देशभरातील प्रमुख रिटेल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. आगामी काही दिवसांत हे दोन्ही प्रोडक्ट्स अ‍ॅमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स संकेतस्थळावरही ग्राहकांना खरेदी करता येतील.

दोन्ही उपकरणांची किंमत, आकर्षक रंग आणि वॉरंटी

वेगवेगळ्या ग्राहकांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार कंपनीने हे गॅजेट्स अत्यंत परवडणाऱ्या दरात सादर केले आहेत:

  • किंमत आणि रंग पर्याय: प्रोबड्स T51 इयरबड्सची किंमत 1,999 रुपये असून ते मोचा क्रीम, ब्लू फ्रॉस्ट आणि एस्प्रेसो ब्लॅक या रंगात मिळतील. तर, एक्सकेप 13° नेकबँडची किंमत अवघी 699 रुपये ठेवण्यात आली असून तो ब्लॅक, ब्लू आणि ग्रे रंगात उपलब्ध आहे.
  • वॉरंटी आणि रिप्लेसमेंट: दोन्ही उत्पादनांवर 1 वर्षाची मुख्य वॉरंटी आणि 2 महिन्यांची अतिरिक्त वॉरंटी दिली जात आहे. तसेच, ग्राहकांना कोणत्याही समस्येसाठी काउंटरवरच थेट रिप्लेसमेंटची सुविधा मिळेल. यासोबतच लावाने आपला प्रोवॉट एअर 10K हा पॉवर बँक देखील बाजारात उतरवला आहे.

६० तासांचा बॅकअप आणि ५०dB नॉईज कॅन्लेशन; प्रोबड्स T51 ची ताकद

उच्च दर्जाचा संगीत अनुभव देण्यासाठी या इयरबड्समध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • म्युझिक ड्राईव्हर्स आणि एएनसी: यामध्ये 12.4mm चे मोठे डायनॅमिक ड्राइव्हर्स देण्यात आले आहेत. आजूबाजूचा आवाज रोखण्यासाठी यात 50dB पर्यंतचे हायब्रिड अ‍ॅक्टिव्ह नॉईज कॅन्लेशन (ANC) फीचर मिळते, जे आपोआप बाहेरील आवाज ओळखून तो कमी करते.
  • स्मार्ट फीचर्स: कान काढून घेताच गाणे आपोआप बंद होण्यासाठी इन-ईयर डिटेक्शन, ब्लूटूथ 5.4 आणि एकाच वेळी दोन उपकरणांना कनेक्ट करण्याची (डुअल-डिवाइस पेअरिंग) सुविधा यात आहे. तसेच कस्टमायझेशनसाठी हे अ‍ॅप सपोर्टसह येते.
  • बॅटरी लाईफ: चार्जिंग केसच्या मदतीने हे इयरबड्स तब्बल 60 तासांचा प्लेबॅक टाईम देतात. फक्त 10 मिनिटे चार्ज केल्यास हे 3 तास अखंड चालतात. मॅट फिनिश असणाऱ्या या बड्सना पाण्याचे थेंब झेलण्यासाठी IPX4 रेटिंग मिळाले आहे.

७० तासांची बॅटरी आणि गेमिंग मोडसह स्वस्त नेकबँड

कमी बजेटमध्ये उत्तम मानकांसह येणाऱ्या एक्सकेप 13° नेकबँडमध्येही अनेक महत्त्वाचे फीचर्स देण्यात आले आहेत:

  • म्युझिक मोड्स आणि गेमिंग: यात 10mm चे डायनॅमिक ड्राइव्हर्स असून प्रो बास, प्रो रॉक आणि प्रो बॅलन्स असे ३ ऑडिओ मोड्स मिळतात. गेमिंग प्रेमींसाठी यात 40ms चा लो-लेटन्सी मोड दिला आहे, ज्यामुळे गेम खेळताना आवाजात कोणताही विलंब (लॅग) जाणवत नाही.
  • बॅटरी आणि वजन: या नेकबँडमध्ये तब्बल 70 तासांची प्रचंड बॅटरी लाईफ मिळते. अवघ्या 10 मिनिटांच्या चार्जिंगवर हा २.५ तास चालू शकतो. या वियरेबलचे वजन केवळ 30 ग्रॅम असून वेगवेगळ्या आकाराचे सिलिकॉन इयर टिप्स यासोबत मोफत मिळतात. यातही वॉटर प्रोटेक्शनसाठी IPX4 रेटिंग दिलेले आहे.
Web Title:
Topics:
संबंधित बातम्या