Home / महाराष्ट्र / Ashadhi Wari : वारीत वारकऱ्यांच्या कुटुंबाला आधार! मृत्यू झाल्यास देहू संस्थानकडून 1 लाखांचे अर्थसहाय्य

Ashadhi Wari : वारीत वारकऱ्यांच्या कुटुंबाला आधार! मृत्यू झाल्यास देहू संस्थानकडून 1 लाखांचे अर्थसहाय्य

Ashadhi Wari : आषाढी वारी (Ashadhi Wari) दरम्यान सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू (Dehu Sansthan) यांनी...

By: Team Navakal
Ashadhi Wari
Social + WhatsApp CTA

Ashadhi Wari : आषाढी वारी (Ashadhi Wari) दरम्यान सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू (Dehu Sansthan) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारीमध्ये सहभागी झालेल्या एखाद्या वारकऱ्याचा अपघाती मृत्यू (Accidental Death) किंवा हृदयविकाराच्या झटक्यासारख्या (Heart Attack) अनपेक्षित कारणामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

देहू संस्थानच्या निर्णयानुसार, आषाढी पालखी सोहळ्यात (Ashadhi Palkhi Sohala) सहभागी झालेल्या वारकऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कायदेशीर वारसांना 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य (Financial Assistance) दिले जाणार आहे. मात्र, ही मदत मिळवण्यासाठी संस्थानने निश्चित केलेल्या नियमांची पूर्तता तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.वारकऱ्यांच्या कुटुंबांना अचानक आलेल्या संकटाच्या काळात आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत

दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) आज सोलापूर जिल्ह्यात मोठ्या भक्तिभावात स्वागत करण्यात आले. “माऊली… माऊली”च्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या जयघोषात पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल झाला.

धर्मपुरी येथे वारकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तब्बल 200 किलो गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी करत माऊलींचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा नातेपुतेच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि सायंकाळी जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुते येथे विसावला.

सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेय, आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांनी पादुकांचे पूजन करून दर्शन घेतले.यावेळी पोलीस बँडच्या सुरावटी, तोफांची सलामी आणि हरिनामाच्या गजरामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. भगव्या पताका फडकवत लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या तालावर तल्लीन झाले होते. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

एकनाथ शिंदेंच्या रेस्क्यू बोट प्रवासावरून वाद

दुसरीकडे, आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या चंद्रभागा नदीतील (Chandrabhaga River) नौकाविहाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी (Disaster Management) राखीव ठेवण्यात आलेल्या रेस्क्यू बोटीचा (Rescue Boat) वापर केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेतील साधनांचा वापर नियमांनुसार झाला का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री तानाजी सावंत आणि शिंदे गटातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते चंद्रभागा नदीत बोटीतून फेरफटका मारताना दिसत आहेत.दरम्यान, आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मदतीच्या निर्णयाचे स्वागत होत असतानाच, रेस्क्यू बोट वापराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा –

 रमेश म्हात्रे पोलिसांसमोर शरण, पाचवी आरोपी साधना कारंडेही अटकेत

भारताच्या बेफिकीरीने बुलेट ट्रेन रखडली ! जपानच्या मंत्र्याच्या आरोपाने खळबळ

जपानच्या राजसिंहासनावर पुरुष वारसाच! राजकुमारी आयकोला पुन्हा नाकारला गादीचा अधिकार

Web Title:
संबंधित बातम्या