Home / देश-विदेश / Bengaluru Daycare Abuse: बंगळुरूत संतापजनक प्रकार! आयटी कंपनीतील डेकेअरमध्ये 2 वर्षांच्या चिमुरड्यांना वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये कोंडले, 5 जणांवर FIR

Bengaluru Daycare Abuse: बंगळुरूत संतापजनक प्रकार! आयटी कंपनीतील डेकेअरमध्ये 2 वर्षांच्या चिमुरड्यांना वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये कोंडले, 5 जणांवर FIR

Bengaluru Daycare Abuse: नोकरदार पालकांसाठी आपले मूल डेकेअर सेंटरमध्ये सुरक्षित आहे की नाही, हा नेहमीच चिंतेचा विषय असतो. मात्र, बंगळुरूमधून...

By: Team Navakal
Bengaluru Daycare Abuse: बंगळुरूत संतापजनक प्रकार! आयटी कंपनीतील डेकेअरमध्ये 2 वर्षांच्या चिमुरड्यांना वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये कोंडले, 5 जणांवर FIR
Social + WhatsApp CTA

Bengaluru Daycare Abuse: नोकरदार पालकांसाठी आपले मूल डेकेअर सेंटरमध्ये सुरक्षित आहे की नाही, हा नेहमीच चिंतेचा विषय असतो. मात्र, बंगळुरूमधून समोर आलेल्या एका अतिशय वेदनादायक आणि संतापजनक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

एका नामांकित आयटी कंपनीच्या कॅम्पसमध्ये चालवल्या जाणाऱ्या डेकेअर सेंटरमध्ये अवघ्या 2 ते 3 वर्षे वयाच्या निष्पाप मुलांवर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या धक्कादायक घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी डेकेअरमधील 5 महिला केअरगिव्हर्स विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

क्रूरतेची सीमा ओलांडली; मुलांवर असे केले अत्याचार

व्हायरल झालेले व्हिडिओ आणि पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, हे लहान मूल रडू नये किंवा त्यांना शिक्षा व्हावी म्हणून या महिला कर्मचाऱ्यांनी क्रूरतेचा कळस गाठला होता:

  • वॉशिंग मशीनमध्ये कोंडले: फ्रंट-लोडिंग वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये २ वर्षांच्या लहान मुलांना बळजबरीने बसवून त्यांना घाबरवले जायचे.
  • टॉयलेट जेटचा अमानुष वापर: रडणाऱ्या लहान मुलांच्या तोंडात कमोडला असणाऱ्या टॉयलेट जेट स्प्रेने थेट पाण्याचा मारा केला जायचा.
  • बाथरूममध्ये डांबले: मुले गप्प बसावीत म्हणून त्यांना कित्येक वेळ अंधाऱ्या बाथरूममध्ये कोंडून ठेवले जात होते.

हे सर्व अत्याचार अशा मुलांवर झाले, ज्यांचे आयटी क्षेत्रात काम करणारे आई-वडील विश्वासाने त्यांना तिथे सोडून कामावर जात होते.

बालहक्क आयोगाची एन्ट्री; पोलिसांकडून तपास सुरू

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर कर्नाटक राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडे (KSCPCR) एक याचिका दाखल करण्यात आली आहे. बालहक्क आयोग आता या संपूर्ण प्रकरणाचा स्वतंत्र अहवाल मागवून स्वतः चौकशी करणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी डेकेअर मधील कर्मचारी, तक्रारदार पालक आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. हे डेकेअर सेंटर आयटी कंपनी थेट चालवते की एखाद्या बाह्य एजन्सीला त्याचे कंत्राट देण्यात आले होते, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या