Home / Uncategorized / boAt Open Ear Earbuds: boAt ने लाँच केले अत्यंत स्वस्त ‘ओपन-इयर’ इयरबड्स! किंमत खूपच कमी; पाहा डिटेल्स

boAt Open Ear Earbuds: boAt ने लाँच केले अत्यंत स्वस्त ‘ओपन-इयर’ इयरबड्स! किंमत खूपच कमी; पाहा डिटेल्स

boAt Open Ear Earbuds: भारतातील वियरेबल्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘बोट’ (boAt) ने भारतीय ग्राहकांसाठी आपले नवीन आणि बजेट फ्रेंडली ‘एअरडोप्स...

By: Team Navakal
boAt Open Ear Earbuds: boAt ने लाँच केले अत्यंत स्वस्त 'ओपन-इयर' इयरबड्स! किंमत खूपच कमी; पाहा डिटेल्स
Social + WhatsApp CTA

boAt Open Ear Earbuds: भारतातील वियरेबल्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘बोट’ (boAt) ने भारतीय ग्राहकांसाठी आपले नवीन आणि बजेट फ्रेंडली ‘एअरडोप्स प्रोक्लिप’ ओपन-इयर इयरबड्स बाजारात आणले आहेत.

सध्या देशात ओपन-इयर प्रकारच्या इयरबड्सची क्रेझ झपाट्याने वाढत आहे, परंतु जास्त किमतीमुळे अनेक जण ते खरेदी करणे टाळत होते. हीच गरज ओळखून बोटने केवळ 1599 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत हे डिव्हाइस लाँच करून मोठा डाव खेळला आहे.

या इयरबड्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेले विशेष सोनिक सील तंत्रज्ञान होय. यामुळे इयरबड्समधून बाहेर येणारा आवाज प्रचंड प्रमाणात कमी केला जातो. परिणामी, तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला तुमच्या फोनमध्ये नक्की काय सुरू आहे किंवा तुम्ही कोणते गाणे ऐकत आहात, याचा सुगावाही लागत नाही, ज्यामुळे तुमची प्रायव्हसी पूर्णपणे जपली जाते.

आकर्षक रंग, किंमत आणि उपलब्धता:

हे नवीन इयरबड्स ग्राहकांना पांढरा (व्हाईट), राखाडी (ग्रे) आणि वाईन अशा ३ सुंदर रंगांमध्ये खरेदी करता येतील. ग्राहकांसाठी हे डिव्हाइस बोटच्या अधिकृत वेबसाईटसह अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

boAt Airdopes ProClip चे मुख्य फिचर्स:

कंपनीने भारतीय युझर्सच्या धावपळीच्या जीवनशैलीचा विचार करून या इयरबड्सची रचना केली आहे. याचे प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • दिवसभर वापरासाठी आरामदायक डिझाईन: यामध्ये क्लाउड फिट आणि अतिशय हलके डिझाईन देण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण दिवसभर हे इयरबड्स कानात घातले तरीही अजिबात त्रास किंवा वेदना होत नाहीत.
  • कानातून पडण्याची भीती नाही: या इयरबड्सची लूप रचना कानांवर अशी कडक पकड बनवते की धावताना, वर्कआउट करताना किंवा प्रवास करतानाही ते कानातून खाली पडत नाहीत.
  • प्रवासात ठेवणार सुरक्षित: यामध्ये अ‍ॅम्बियंट साउंड अवेअरनेस हे फिचर दिले आहे. यामुळे गाणी ऐकत असतानाही युझर्सला मागून येणाऱ्या गाड्यांचा हॉर्न किंवा लोकांचा आवाज स्पष्ट ऐकू येतो आणि रस्त्यावरून चालताना सुरक्षा राखली जाते.

कमी बजेटमध्ये उत्तम डील; पण ‘या’ गोष्टीकडे द्यावे लागेल लक्ष

१,५९९ रुपयांच्या किंमतीत आरामदायी वापर, प्रायव्हसी आणि उत्तम सुरक्षा देणारा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, सामान्यतः ओपन-इयर इयरबड्सच्या रचनेमुळे अनेकदा संगीताचा मूळ फील किंवा बेस थोडा कमी जाणवतो. अशा परिस्थितीत बोट कंपनीने या बजेट डिव्हाइसमध्ये ऑडिओ आउटपुटची ही उणीव किती प्रमाणात भरून काढली आहे, हे पुढील काही दिवसांतील युझर्सच्या रिव्ह्यूनंतरच स्पष्ट होईल.

हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या