Home / देश-विदेश / Census 2027: देशात पहिल्यांदाच होणार ‘डिजिटल जनगणना’! मोबाईलवर विचारले जाणार हे 33 प्रश्न; पाहा तुमचे नाव आणि घर कसं नोंदवायचं?

Census 2027: देशात पहिल्यांदाच होणार ‘डिजिटल जनगणना’! मोबाईलवर विचारले जाणार हे 33 प्रश्न; पाहा तुमचे नाव आणि घर कसं नोंदवायचं?

Census 2027 Digital Questions: देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी 16 वी जनगणना आता आधुनिक अवतारात समोर येत आहे. ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेचा...

By: Team Navakal
Census 2027 Digital Questions
Social + WhatsApp CTA

Census 2027 Digital Questions: देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी 16 वी जनगणना आता आधुनिक अवतारात समोर येत आहे. ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेचा भाग म्हणून जनगणना 2027 ही पूर्णपणे कागदमुक्त आणि डिजिटल पद्धतीने राबवली जाणार आहे.

मोबाईल ॲप आणि रिअल-टाइम डेटा संकलनामुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होणार आहे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भातील प्रशासकीय तयारी पूर्ण केली असून पहिल्या टप्प्यासाठी नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या 33 प्रश्नांची यादीही अधिसूचित केली आहे.

Census 2027 Digital Questions: यंदाची जनगणना का आहे खास?

  • मोबाईल ॲपचा वापर: घराघरात जाऊन मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे माहिती भरतील.
  • ऑनलाईन स्व-गणना (Self-Enumeration): नागरिकांना स्वतःहून आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरण्याचा पर्याय पहिल्यांदाच देण्यात आला आहे.
  • प्रशासकीय सीमा गोठवल्या: जनगणनेच्या कामात अचूकता यावी म्हणून 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 या काळात जिल्हा, तालुके आणि गावांच्या सीमांमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत.

Census 2027 Digital Questions: हे आहेत ते 33 प्रश्न

घर-यादी (House Listing) तयार करताना नागरिकांना खालील प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील:

  1. इमारतीचा क्रमांक (स्थानिक प्राधिकरणाने दिलेला)
  2. जनगणनेनुसार घराचा क्रमांक
  3. घराच्या जमिनीसाठी वापरलेले मुख्य साहित्य
  4. भिंतींचे मुख्य साहित्य
  5. छताचे मुख्य साहित्य
  6. घराचा वापर (निवासी की व्यावसायिक)
  7. घराची सद्यस्थिती
  8. कुटुंबाची एकूण संख्या
  9. कुटुंबातील सदस्यांची एकूण संख्या
  10. कुटुंबप्रमुखाचे नाव
  11. कुटुंबप्रमुखाचे लिंग
  12. कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती/जमाती किंवा इतर प्रवर्गातील आहे का?
  13. घराची मालकी (स्वतःचे की भाड्याचे)
  14. राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या खोल्यांची संख्या
  15. कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या
  16. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत
  17. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता (घरात की बाहेर)
  18. प्रकाशाचे साधन (वीज की इतर)
  19. शौचालयाची उपलब्धता
  20. शौचालयाचा प्रकार
  21. सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था
  22. आंघोळीची सोय
  23. स्वयंपाकघर आणि गॅस जोडणी (LPG/PNG) आहे का?
  24. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन
  25. रेडिओ किंवा ट्रान्झिस्टरची उपलब्धता
  26. टीव्ही (दूरचित्रवाणी)
  27. इंटरनेट सुविधा
  28. लॅपटॉप किंवा संगणक
  29. टेलिफोन/मोबाईल किंवा स्मार्टफोन
  30. सायकल/स्कूटर किंवा मोटारसायकल
  31. कार/जीप किंवा व्हॅन
  32. अन्नामध्ये प्रामुख्याने वापरले जाणारे धान्य
  33. मोबाईल क्रमांक (केवळ सरकारी संवादासाठी)

Census 2027 Digital Questions: महाराष्ट्रातील जनगणनेचे वेळापत्रक

महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्प्यासाठी (घर-यादी आणि घरगणना) खालील तारखा निश्चित केल्या आहेत:

  • स्व-गणना (Self Enumeration): 1 मे ते 15 मे 2026
  • प्रत्यक्ष क्षेत्रीय काम (घरोघरी भेट): 16 मे ते 14 जून 2026

सुरक्षेची विशेष काळजी

नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित राहावी यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा प्रणाली (MFA) वापरली जाणार आहे. केवळ अधिकृत अधिकाऱ्यांनाच पासवर्ड आणि ओटीपीद्वारे ही माहिती पाहता येईल. नागरिकांनी केवळ https://se.census.gov.in याच अधिकृत पोर्टलचा वापर करावा आणि RGICEN या कीवर्ड असलेल्या एसएमएसलाच प्रतिसाद द्यावा.

प्रत्यक्ष कामासाठी राज्यात सुमारे 2.64 लाख कर्मचारी तैनात करण्यात आले असून, त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

हे देखील वाचा – HSC Result 2026: बारावीचा निकाल कसा पाहायचा? मोबाईलवर रिझल्ट पाहण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

Web Title:
संबंधित बातम्या