Home / देश-विदेश / Mamata Banerjee Result 2026 : ममता बॅनर्जींचा राजीनाम्यास नकार, तर पुढे काय? उज्ज्वल निकम यांनी सांगितला ‘हा’ कायदेशीर मार्ग; बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार?

Mamata Banerjee Result 2026 : ममता बॅनर्जींचा राजीनाम्यास नकार, तर पुढे काय? उज्ज्वल निकम यांनी सांगितला ‘हा’ कायदेशीर मार्ग; बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार?

Mamata Banerjee Result 2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भारतीय राजकारणात एक मोठे स्थित्यंतर घडवून आणले आहे. गेल्या १५...

By: Team Navakal
Mamata Banerjee Result 2026 :
Social + WhatsApp CTA

Mamata Banerjee Result 2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भारतीय राजकारणात एक मोठे स्थित्यंतर घडवून आणले आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला जोरदार धक्का देत भारतीय जनता पक्षाने २०७ जागांसह दणदणीत विजय मिळवला आहे. २९३ जागांच्या विधानसभेत स्पष्ट बहुमताचा आकडा पार करत भाजप आता सत्तास्थापनेच्या तयारीत आहे. मात्र, दुसरीकडे मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पराभव स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला असून, त्या पदाचा राजीनामा देणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. यामुळे बंगालमध्ये सध्या अभूतपूर्व राजकीय आणि घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.

निकाल काय सांगतात?
या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत २०७ जागांवर विजय मिळवला, तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर पक्षांची पाटी जवळजवळ कोरीच राहिली असून त्यांना प्रत्येकी केवळ दोन जागा मिळवता आल्या आहेत. अशा प्रकारे मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिला असला तरी, ममता बॅनर्जी यांनी “नैतिकदृष्ट्या आम्हीच जिंकलो आहोत,” असा दावा करत निवडणूक निकालांवर अविश्वास व्यक्त केला आहे.

विधीज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचे भाष्य-
या संपूर्ण परिस्थितीवर भाष्य करताना ज्येष्ठ विधीज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेला चुकीचे ठरवले आहे. निकम म्हणाले की, “लोकशाहीत मतदारांचा कौल मान्य करणे अनिवार्य असते. मुख्यमंत्र्यांच्या अशा हट्टापायी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जर त्यांना पराभव मान्य नसेल, तर त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून न्यायालयात दाद मागायला हवी. मात्र, राजीनामा न दिल्यास राज्यपालांना आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून हस्तक्षेप करावा लागेल.” निकम यांनी असेही सुचवले की, हा पराभव ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा मानसिक धक्का असू शकतो, परंतु त्यांनी घटनात्मक पायंडा पाळणे अपेक्षित आहे.

संविधान काय सांगते? (अनुच्छेद १६४ आणि १७२)-
भारतीय संविधानानुसार, सत्तेचा कारभार हा लोकशाही तत्त्वावर चालतो. अनुच्छेद १६४ स्पष्ट करतो की, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात आणि मंत्रिमंडळ तोपर्यंतच अधिकारावर राहू शकते जोपर्यंत त्यांना विधानसभेत बहुमत प्राप्त असते. बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्र्यांना तात्काळ राजीनामा देणे बंधनकारक आहे. जर मावळते मुख्यमंत्री राजीनामा देत नसतील, तर अनुच्छेद १६३ अन्वये राज्यपाल आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घेऊ शकतात. तसेच अनुच्छेद १७२ नुसार विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन सरकारकडे सत्तेची सूत्रे जाणे अनिवार्य आहे.

पुढील दिशा आणि राज्यपालांची भूमिका-
ममता बॅनर्जी यांनी राजभवनात जाऊन राजीनामा देण्यास नकार दिल्याने आता सर्वांचे लक्ष राज्यपाल महोदयांच्या भूमिकेकडे लागले आहे. राज्यपाल भाजपच्या विधीमंडळ नेत्याला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. जर मावळत्या सरकारने सहकार्य केले नाही, तर घटनेतील तरतुदींनुसार विधानसभा विसर्जित करून नवीन सरकारला शपथ देण्याचे अधिकार राज्यपालांकडे आहेत.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या