Modi Cabinet expansion and reshuffle 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला लवकरच दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. मोदी ३.० मंत्रिमंडळाचा पहिला मोठा विस्तार आणि फेरबदल लवकरच होण्याची शक्यता असून, त्याआधी २१ मे रोजी पंतप्रधानांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
Modi Cabinet Reshuffle: २१ मे रोजी होणार मंथन
रिपोर्टनुसार, या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. १० जून २०२४ रोजी मोदी ३.० सरकारचा शपथविधी झाला होता. आता या सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मंत्रिमंडळात फेरबदल केले जाऊ शकतात, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Modi Cabinet Reshuffle: बैठकीचा मुख्य अजेंडा काय?
१. योजनांचा आढावा: विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल.
२. कामगिरीचे मूल्यमापन: विविध मंत्रालये आणि विभागांच्या कामकाजाचे सादरीकरण पंतप्रधानांसमोर केले जाण्याची शक्यता आहे.
३. निवडणुकीचे पडसाद: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या कामगिरीचा विचार करून काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.
Modi Cabinet Reshuffle: काही मंत्र्यांची सुट्टी, तर काहींना पदोन्नती?
राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही, त्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. दुसरीकडे, आगामी काळातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन काही घटक पक्षांना झुकते माप दिले जाण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममधील पक्षाच्या मजबूत कामगिरीनंतर या राज्यांतील प्रतिनिधींना मोठी जबाबदारी मिळू शकते.
पंतप्रधान मोदी वेळोवेळी अशा बैठका घेऊन प्रशासकीय कामांना गती देत असतात. मात्र, सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना होणारी ही बैठक केवळ प्रशासकीय नसून पूर्णपणे राजकीय असल्याचे मानले जात आहे.
हे देखील वाचा – Petrol Diesel Price Hike 2026: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवे दर









