Home / लेख / OnePlus N6 Launch: वनप्लसचा देशातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच! तब्बल 8,000mAh ची अवाढव्य बॅटरी, 3 दिवस चालणार बॅकअप

OnePlus N6 Launch: वनप्लसचा देशातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच! तब्बल 8,000mAh ची अवाढव्य बॅटरी, 3 दिवस चालणार बॅकअप

OnePlus N6 Launch : स्मार्टफोन जगतातील प्रसिद्ध ब्रँड वनप्लसने भारतीय ग्राहकांसाठी आपली नवी बजेट सिरीज बाजारात आणली आहे. कंपनीने आपला...

By: Team Navakal
OnePlus N6 Launch: वनप्लसचा देशातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच! तब्बल 8,000mAh ची अवाढव्य बॅटरी, ३ दिवस चालणार बॅकअप
Social + WhatsApp CTA

OnePlus N6 Launch : स्मार्टफोन जगतातील प्रसिद्ध ब्रँड वनप्लसने भारतीय ग्राहकांसाठी आपली नवी बजेट सिरीज बाजारात आणली आहे. कंपनीने आपला सर्वात परवडणारा ५जी स्मार्टफोन ‘OnePlus N6’ अधिकृतपणे लाँच केला आहे. हा फोन कंपनीच्या संपूर्ण पोर्टफोलिओमधील आजवरचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यामध्ये दिलेली 8,000mAh क्षमतेची अवाढव्य बॅटरी होय. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा फोन सलग 3 दिवस चालू शकतो, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या बजेट फोनमध्ये दमदार मीडियाटेक प्रोसेसर, आधुनिक अँड्रॉइड सिस्टीम आणि उत्कृष्ट कूलिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

किंमत आणि धमाकेदार लाँच ऑफर्स

OnePlus N6 स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये आणि ‘फ्रेश मिंट’ व ‘मिडनाईट ब्लॅक’ अशा दोन आकर्षक रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल:

  • किंमत: या फोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे, तर 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
  • विक्री कधी सुरू होणार?: या फोनची अधिकृत विक्री 4 जुलैपासून अ‍ॅमेझॉन इंडिया आणि वनप्लसच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे.
  • बँक डिस्काउंट: लाँच ऑफर अंतर्गत, ICICI बँकेसह काही निवडक बँक कार्ड्सचा वापर करून खरेदी केल्यास 2,000 रुपये त्वरित सवलत मिळेल.
  • प्राईम डे सेलचा अतिरिक्त फायदा: अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान खरेदी केल्यास आणखी 1,000 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट दिला जाईल. या सर्व ऑफर्स एकत्र केल्यावर फोनची सुरुवातीची प्रभावी किंमत अवघी 19,999 रुपये इतकी होईल.

OnePlus N6 चे वैशिष्ट्यपूर्ण स्पेसिफिकेशन्स

कमी किमतीत युजर्सला उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यासाठी कंपनीने यात उत्तम हार्डवेअर दिले आहे:

  • डिस्प्ले आणि सिस्टीम: फोनमध्ये 6.75 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे, जो 120Hz चा रीफ्रेश रेट आणि 1,200 निट्सची पीक ब्राइटनेस देतो. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित असणाऱ्या ऑक्सिजन ओएस 16 वर चालतो. कंपनी या फोनसाठी 2 वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे.
  • प्रोसेसर आणि गेमिंग: परफॉर्मन्ससाठी यात मीडियाटेक डायमेन्सिटी 6360 अपेक्स प्रोसेसर आणि एआरएम माली-जी५७ ग्राफिक्स कार्ड दिले आहे. फोन गेमिंग करताना तापू नये म्हणून यात विशेष व्हेंपर चेंबर कूलिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे.

बॅटरीचे आयुष्य आणि प्रगत एआय कॅमेरा

या फोनची 8,000mAh बॅटरी 45W फास्ट चार्जिंग, बायपास चार्जिंग आणि 5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, तब्बल 1,600 वेळा चार्ज केल्यावर आणि सलग 7 वर्षांच्या वापरानंतरही या फोनची बॅटरी हेल्थ 80 टक्क्यांपर्यंत टिकून राहील. मजबूत बांधणीसाठी या फोनला मिलिटरी-ग्रेड ड्युरेबिलिटी आणि IP65 रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. कारची जाडी 8.88mm आणि वजन 224 ग्रॅम आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या पाठीमागे 50MP चा मुख्य कॅमेरा आणि फ्रंटला सेल्फीसाठी 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. या बजेट फोनमध्ये गुगल जेमिनी, एआय इरेझर, एआय अनब्लर, एआय नोट्स आणि डॉक्युमेंट स्कॅनिंग सारखे अनेक प्रीमियम एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) फीचर्स इन-बिल्ट देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी, ड्युअल ४जी, वाय-फाय ५, ब्लूटूथ ५.३ आणि युएसबी टाईप-सी पोर्ट मिळतो.

हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगड किल्ल्यावरील ‘तो’ धोकादायक कडा अखेर बंद; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांचे मोठे पाऊल

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या