Home / देश-विदेश / NEET Paper Leak : NEET पेपरफुटीचा सर्वात मोठा गौप्यस्फोट! सीबीआयच्या हाती लागलं असं काही की तपासाची दिशाच बदलली; पाहा काय आहे ‘नवा ट्विस्ट’!

NEET Paper Leak : NEET पेपरफुटीचा सर्वात मोठा गौप्यस्फोट! सीबीआयच्या हाती लागलं असं काही की तपासाची दिशाच बदलली; पाहा काय आहे ‘नवा ट्विस्ट’!

NEET Paper Leak : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला असून, केंद्रीय...

By: Team Navakal
Nashik Neet Paper Leak
Social + WhatsApp CTA

NEET Paper Leak : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला असून, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. या देशव्यापी घोटाळ्यात आतापर्यंत सीबीआयने जयपूर, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) अशा विविध शहरांमधून एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान आरोपींच्या वास्तव्यावरून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल संच आणि गुन्हेगारी कट सिद्ध करणारी महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रातील संशयितांचे जाळे आणि ‘कुरिअर’ कनेक्शन
या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगरपर्यंत पोहोचले आहेत. नाशिकमधून शुभम खैरनार आणि अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, शुभम खैरनार हा बीएएमएसच्या तृतीय वर्षात शिकत असून तो ‘करिअर काऊन्सिलर’ म्हणूनही कार्यरत होता. या व्यवसायाच्या आडून त्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांचे एक मोठे वर्तुळ तयार केले होते. पुण्यातून धनंजय लोखंडे याने कुरिअरच्या माध्यमातून शुभमला प्रश्नपत्रिका पाठवली होती. शुभमने ही प्रश्नपत्रिका १० लाख रुपयांत खरेदी करून ती टेलिग्रामच्या माध्यमातून हरियाणातील गुरुग्राम येथील मध्यस्थाला १५ लाख रुपयांना विकल्याचे उघड झाले आहे.

लातूर कनेक्शन आणि हस्तलिखित प्रश्नपत्रिकांचा संशय
लातूरमध्येही या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवले आहेत. तपासाचा मुख्य रोख हा संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या खासगी क्लासेसवर आहे. परीक्षपूर्वी काही विद्यार्थ्यांना हस्तलिखित प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या होत्या, त्यातील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. ही हस्तलिखित प्रश्नपत्रिका नेमकी कोणी तयार केली आणि ती कोणत्या मार्गाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.

धाडसत्र आणि आरोपींची पार्श्वभूमी
सीबीआयने शुभम खैरनारच्या नाशिकमधील भाड्याच्या घरावर आणि नांदगाव येथील मूळ निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेतली. शुभमच्या कुटुंबाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर आले असून, त्याच्या भावालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. शुभमची गुन्ह्यातील व्याप्ती पाहता, सीबीआय त्याला दिल्लीतील न्यायालयात हजर करून अधिक कोठडीची मागणी करणार आहे, जेणेकरून या कटातील इतर सूत्रधारांचा पत्ता लावता येईल.

परीक्षा रद्द होण्यामागचे ‘सीकर’ कनेक्शन-
नीट परीक्षा रद्द होण्यामागे राजस्थानमधील सीकर येथील घटना मुख्य कारण ठरली आहे. परीक्षेपूर्वी सीकरमध्ये एक ‘गेस पेपर’ वितरित करण्यात आला होता, ज्यामध्ये एकूण ४१० प्रश्न होते. धक्कादायक बाब म्हणजे, यातील १२० ते १३५ प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेत जसेच्या तसे विचारले गेले होते. विशेषतः रसायनशास्त्र विषयातील प्रश्नांमध्ये कमालीचे साधर्म्य आढळले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या