Home / देश-विदेश / QS World University Rankings 2027: जगातील सर्वोत्तम 200 विद्यापीठांमध्ये भारताच्या फक्त 3 संस्था; पाहा यादी

QS World University Rankings 2027: जगातील सर्वोत्तम 200 विद्यापीठांमध्ये भारताच्या फक्त 3 संस्था; पाहा यादी

QS World University Rankings 2027: जगभरातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या प्रसिद्ध ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२७’ ची ताजी यादी...

By: Team Navakal
QS World University Rankings 2027: जगातील सर्वोत्तम 200 विद्यापीठांमध्ये भारताच्या फक्त 3 संस्था; पाहा यादी
Social + WhatsApp CTA

QS World University Rankings 2027: जगभरातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या प्रसिद्ध ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२७’ ची ताजी यादी जाहीर झाली आहे. यंदाच्या मानांकनात भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्लीने (IIT Delhi) देशात अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयआयटी दिल्लीने जागतिक क्रमवारीत ५ स्थानांची कडक झेप घेतली असून, १२३ व्या स्थानावरून थेट ११८ व्या स्थानावर मजल मारली आहे.

यंदाच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या २०० संस्थांमध्ये भारताच्या अवघ्या ३ शिक्षण संस्थांनाच आपले स्थान निर्माण करता आले आहे. यामध्ये आयआयटी दिल्ली ११८ व्या क्रमांकावर, आयआयटी बॉम्बे १३४ व्या क्रमांकावर आणि आयआयटी मद्रास १७० व्या क्रमांकावर आहे.

भारताच्या अव्वल ३ संस्थांची कामगिरी

संशोधन, रोजगार आणि शैक्षणिक दर्जा या निकषांवर भारतातील आघाडीच्या ३ संस्थांचे गुण खालीलप्रमाणे राहिले आहेत:

  • आयआयटी दिल्ली (गुण ६५.७): संशोधन क्षेत्रात अत्यंत कडक कामगिरी करत या संस्थेने सायटेशन्स पर फॅकल्टीमध्ये ९७.३ गुण मिळवले. याशिवाय एम्प्लॉयर रेप्युटेशनमध्ये ९६.९, शैक्षणिक प्रतिष्ठेमध्ये ६४.६ आणि सस्टेनेबिलिटीमध्ये ८१.२ गुण मिळवले आहेत.
  • आयआयटी बॉम्बे: या संस्थेने एम्प्लॉयर रेप्युटेशनमध्ये सर्वाधिक ९७.८ गुण मिळवले. तसेच सायटेशन्स पर फॅकल्टीमध्ये ७९.३, शैक्षणिक प्रतिष्ठेमध्ये ७२.५ आणि एम्प्लॉयमेंट आउटकम्समध्ये ७८.२ गुण मिळवून देशात दुसरे स्थान मिळवले.
  • आयआयटी मद्रास: तिसऱ्या स्थानावरील या संस्थेने सायटेशन्स पर फॅकल्टीमध्ये ९५.३, एम्प्लॉयर रेप्युटेशनमध्ये ८७.४ आणि सस्टेनेबिलिटीमध्ये ७४.८ गुण मिळवून आपली कामगिरी सुधारली आहे.

भारतातील टॉप २० शिक्षण संस्थांची यादी

जागतिक क्रमवारीत स्थान मिळवणारे भारतातील मुख्य २० शिक्षण संस्था आणि त्यांचे जागतिक रँकिंग पुढीलप्रमाणे आहे:

भारतीय संस्थाराष्ट्रीय रँकजागतिक रँक
आयआयटी दिल्ली1118
आयआयटी बॉम्बे2134
आयआयटी मद्रास3170
आयआयटी खरगपूर4205
भारतीय विज्ञान संस्था (IISc) बेंगळुरू5221
आयआयटी कानपूर6221
दिल्ली विद्यापीठ7332
आयआयटी रुरकी8335
आयआयटी गुवाहाटी9349
शूलिनी युनिव्हर्सिटी10452
अण्णा युनिव्हर्सिटी11470
आयआयटी (BHU) वाराणसी12510
चंदीगड युनिव्हर्सिटी13526
आयआयटी इंदूर14546
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU)15555
बिट्स पिलानी16575
आयआयटी हैदराबाद17588
वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT)18597
सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी19655
जामिया मिलिया इस्लामिया20686

जागतिक पातळीवर ‘एमआयटी’चा दबदबा कायम

जागतिक पातळीवर विचार केला तर अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या संस्थेने सलग १५ व्या वर्षी आपले पहिले स्थान कायम ठेवून जागतिक पातळीवर एकहाती वर्चस्व राखले आहे.

जगातील टॉप ५ संस्था आणि त्यांचे गुण:

  1. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) – गुण 100
  2. इम्पीरियल कॉलेज लंडन – गुण 99.2
  3. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी – गुण 99.2
  4. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड – गुण 98.6
  5. हार्वर्ड युनिव्हर्सिटी – गुण 97.4

यंदाच्या रँकिंगवरून स्पष्ट होते की, भारताने जागतिक उच्च शिक्षण क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. जरी पहिल्या २०० मध्ये केवळ तीनच संस्था असल्या, तरी अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांच्या रँकिंगमध्ये सुधारणा केली आहे. संशोधन आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यावर भारताचा वाढता भर यातून दिसून येत आहे.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या