Home / देश-विदेश / Trump on India: “भारत म्हणजे नरक!”; ट्रम्प यांनी शेअर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भारतीयांमध्ये संताप

Trump on India: “भारत म्हणजे नरक!”; ट्रम्प यांनी शेअर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भारतीयांमध्ये संताप

Trump on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या एका कृतीने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प...

By: Team Navakal
Trump on India
Social + WhatsApp CTA

Trump on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या एका कृतीने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध रेडिओ होस्ट मायकेल सॅव्हेज यांचे एक पॉडकास्ट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या पॉडकास्टमध्ये भारत, चीन आणि इतर काही देशांचा उल्लेख ‘नरक’ (Hell-holes) असा करत अत्यंत आक्षेपार्ह आणि वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली आहे. अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्व कायद्यात बदल करण्याच्या मागणीवरून हा नवा वाद उफाळून आला आहे.

नेमका आरोप काय आहे?

मायकेल सॅव्हेज यांनी आपल्या ‘सॅव्हेज नेशन’ या कार्यक्रमात दावा केला की, भारत आणि चीनमधील लोक केवळ मुलाला जन्म देण्यासाठी अमेरिकेत येतात. अमेरिकेच्या सध्याच्या कायद्यानुसार, तिथे जन्मलेले बाळ तात्काळ अमेरिकन नागरिक बनते. सॅव्हेज यांनी या स्थलांतरितांचा उल्लेख ‘लॅपटॉप घेऊन फिरणारे गँगस्टर’ असा केला असून, त्यांनी अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोपही केला आहे. “या लोकांनी माफिया कुटुंबांपेक्षाही जास्त नुकसान अमेरिकेचे केले आहे,” असे अजब तर्क सॅव्हेज यांनी या पत्रात मांडले आहेत.

भारतीयांबद्दल आकस आणि नोकऱ्यांचा मुद्दा

सॅव्हेज यांनी केवळ देशाचाच अपमान केला नाही, तर भारतीय स्थलांतरितांवरही निशाणा साधला आहे. “कॅलिफोर्नियातील हाय-टेक कंपन्यांमध्ये आता पांढऱ्या व्यक्तीला नोकरी मिळणे अशक्य झाले आहे, कारण तिथली सर्व यंत्रणा आता भारतीय आणि चिनी लोक चालवत आहेत,” असे म्हणत त्यांनी नोकऱ्यांच्या मुद्द्यावरून विषारी टीका केली आहे. ट्रम्प यांनी ही वर्णद्वेषी पोस्ट त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याने याला अधिकृत पाठबळ मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ट्रम्प यांची जन्मसिद्ध नागरिकत्वाविरोधात मोहीम

डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी 2025 मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर लगेचच जन्मसिद्ध नागरिकत्व बंद करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. ट्रम्प यांचा असा दावा आहे की, जगातील कोणत्याही देशात अशा प्रकारचा कायदा नाही. मात्र, हा दावा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे, कारण कॅनडा आणि मेक्सिकोसह जगातील सुमारे 36 देशांमध्ये हा कायदा आजही अस्तित्वात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

सध्या हा संपूर्ण विषय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ट्रम्प यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, “जर न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिला, तर यामुळे अमेरिकेचे केवळ आर्थिक नुकसानच होणार नाही, तर देशाची प्रतिष्ठाही धुळीला मिळेल.” आता न्यायालयाचा निकाल काय येतो आणि भारत-चीन सारख्या देशांबद्दल केलेल्या या विधानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे देखील वाचा – 

Maharashtra FDA Rules : हॉटेलमध्ये जेवताना सावधान! पनीरच्या नावाखाली दुसरंच काहीतरी तर खात नाही ना? महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Manoj Jarange Patil : “तुझे तुकडे होतील!”; गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या वाल्मिक कराड गँगवर जरांगे पाटील कडाडले

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या