Home / क्रीडा / Bangalore: बंगळुरूने सलग दुसर्‍यादा आयपीएल स्पर्धा जिंकली !विराटच्या अर्धशतकामुळे गुजरातवर एकतर्फी विजय

Bangalore: बंगळुरूने सलग दुसर्‍यादा आयपीएल स्पर्धा जिंकली !विराटच्या अर्धशतकामुळे गुजरातवर एकतर्फी विजय

Bangalore : सिख सलाम (३), हॅझलवुड (२) आणि भुवनेश्वर कुमार (२) यांची प्रभावी गोलंदाजी आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA
Bangalore : सिख सलाम (३), हॅझलवुड (२) आणि भुवनेश्वर कुमार (२) यांची प्रभावी गोलंदाजी आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर आयपीएलच्या महाअंतिम सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सवर ५ विकेटने एकतर्फी विजय मिळवून या स्पर्धेची सलग दुसर्‍यादा ट्रॉफी जिंकली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज झालेल्या या सामन्यात गुजरातने दिलेले १५५ धावांचे आव्हान बंगळुरुने ५ गडी गमावून १८ षटकांत सहज पूर्ण करुन विजयीत्सोव साजरा केला. या विजयात विराट कोहली ४२ चेंडूंत नाबाद ७५ धावा करुन चमकला.
बंगळुरुचे कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मग जोश हॅझलवुडच्या तिसर्‍या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने ८ चेंडूंत १० धावा केल्या. मग सलामीवीर साई सुदर्शनही १२ धावांवर खेळत असताना चुकीचा फटका मारुन झेलबाद झाला. त्याला भुवनेश्वर कुमारने माघारी धाडले. त्यामुळे गुजरातची अवस्था ३.४ षटकांत २ बाद २६ धावा अशी झाली होती. त्यानंतरही बंगळुरुच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा कायम ठेवल्यामुळे निशांत सिंधू आणि जोस बटलर या जोडीला चौकार आणि षटकार ठोकताच आले नाही. या दबावात गुजरातची धावगती अतिशय धिमी झाली. सिंधू हा रसिख सलामच्या आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लगावण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने १८ चेंडूंत २० धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरच्या साथीत बटलरला फारसे काही करता आले नाही. त्याला (१५ ) कृणाल पंड्याने बाद केले. मग ३ चेंडूत १४ धावांवर खेळताना अर्शद खान पाचव्या विकेटच्या रुपात माघारी परतला. परिणामी गुजरातला १०० धावांचा टप्पा १४.२ षटकांपर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर रसिख सलामने तेवतियाला ७ धावांवर झेलबाद करुन गुजरातचे कंबरडे मोडले. भुवनेश्वरने आपल्या १९ षटकाच्या ३ चेंडूवर होल्डरला झेलबाद करुन तंबूत धाडले. डाव्याच्या शेवटच्या षटकात रशीद खान एक षटकार ठोकून झेलबाद झाला. शेवटी वॉशिंग्टन सुंदर ३७ चेंडूंत ५० धावा आणि कागिसो रबाडा ३ चेंडूंत ३ धावा करुन नाबाद राहिले. त्यामुळे गुजरातने निर्धारीत षटकात ८ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरुकडून रसिख सलामने ३, जोश हॅझलवुड आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २-२, कृणाल पंड्याने १ गडी बाद केला. 
या धावसंख्येचा पाठलाग करताना बंगळुरुचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यर सुरवातीपासून गुजरातच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी २१ चेंडूंत ५० धावांचा टप्पा पार केला. मग व्यंकटेश १५ चेंडूंत २ षटकार आणि ४ चौकारांसह ३२ धावांवर खेळत असताना त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. त्यापाठोपाठ देवदत्त पडिक्कलला फक्त १ धावेवर कागिसो रबाडाने माघारी पाठवले. रजत पाटीदार रशीद खानच्या नवव्या षटकाच्या दुसर्या चेंडूवर सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याने १३ चेंडूंत १५ धावा केल्या. त्यानंतर या षटकाच्या पाचव्या चेंडूंवर कृणाल पंड्या पायचित झाल्यामुळे बंगळुरुचा संघ काहीसा दबावात आला. मात्र दुसर्‍या बाजूला आक्रमक फलंदाजी करणार्या विराट कोहलीने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. टिम डेव्हिडने विराटला चांगली साथ दिली. मात्र तो १६ चेंडूंत २४ धावा करुन अर्शद खानचा शिकार बनला. मात्र तोपर्यंत हा सामना बंगळुरुच्या बाजूने पूर्ण झुकला होता. शेवटी जितेश शर्माच्या साथीत विराटने षटकार ठोकून १८ षटकांत विजयी आकडा गाठला आणि आपल्या संघाचे आयपीएलच्या चषकावर नाव कोरले. विराटने ४२ चेंडूंत नाबाद ७५ आणि जितेश शर्माने १४ चेंडूंत ११ धावा केल्या.       
Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या