Home / लेख / तब्बल 25 हजार रुपये स्वस्त मिळतोय iPhone; ऑफर एकदा पाहाच

तब्बल 25 हजार रुपये स्वस्त मिळतोय iPhone; ऑफर एकदा पाहाच

iPhone 15 Discount Deal: जर तुम्ही नवीन आयफोन १७ च्या लाँचनंतर कमी बजेटमध्ये एक उत्तम प्रीमियम फोन शोधत असाल, तर...

By: Team Navakal
तब्बल 25 हजार रुपये स्वस्त मिळतोय iPhone; ऑफर एकदा पाहाच
Social + WhatsApp CTA

iPhone 15 Discount Deal: जर तुम्ही नवीन आयफोन १७ च्या लाँचनंतर कमी बजेटमध्ये एक उत्तम प्रीमियम फोन शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सध्याच्या घडीला आयफोन १५ हा एक अतिशय फायदेशीर पर्याय ठरू शकतो. प्रसिद्ध रिटेल स्टोअर विजय सेल्सवर या फोनवर सध्या भरघोस सवलत दिली जात आहे. या डीलमध्ये थेट किमतीतील कपातीसोबतच बँक ऑफर्सचाही फायदा ग्राहकांना मिळत आहे.

हा फोन त्याच्या उत्कृष्ट कॅमेरा क्वालिटी आणि शक्तिशाली प्रोसेसरसाठी ओळखला जातो. या ऑफरमुळे महागडा वाटणारा हा फोन आता सामान्यांच्या बजेटमध्ये आला आहे.

iPhone 15 Discount Deal: किंमत आणि बँक ऑफर्सचा गणित

सप्टेंबर 2023 मध्ये जेव्हा हा फोन भारतात लाँच झाला, तेव्हा त्याची मूळ किंमत 79,900 रुपये होती. मात्र, आता विजय सेल्सवर हा फोन अतिशय स्वस्तात खरेदी करता येईल:

  • थेट सवलत: आयफोन १५ चा 128GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट विजय सेल्सच्या प्लॅटफॉर्मवर सध्या 57,900 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे.
  • बँक ऑफर: जर तुम्ही खरेदी करताना एचडीएफसी (HDFC) बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केले, तर तुम्हाला थेट 3,500 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल.
  • प्रभावी किंमत: ही बँक ऑफर लागू केल्यानंतर या फोनची प्रभावी किंमत अवघी 54,400 रुपये इतकी खाली येते.

एकंदरीत पाहिल्यास, लाँचिंगच्या किमतीच्या तुलनेत हा फोन तब्बल 25,500 रुपये स्वस्त मिळत आहे.

iPhone 15 Discount Deal: पाहा काय आहेत दमदार फीचर्स

कमी किमतीत मिळत असला तरी या फोनचे फीचर्स आजच्या काळातील इतर फ्लॅगशिप फोन्सना कडक टक्कर देतात.

  • डिसप्ले: यामध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिसप्ले देण्यात आला आहे. याचे रेझोल्यूशन 1179×2556 पिक्सेल असून, उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसण्यासाठी यामध्ये 2000 निट्सची पीक ब्राइटनेस मिळते.
  • प्रोसेसर आणि ओएस: हा फोन अ‍ॅपलच्या शक्तिशाली ए16 बायोनिक प्रोसेसरवर चालतो आणि यात नवीन आयओएस 18 ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट मिळतो.
  • डिझाईन आणि वजन: फोनचे वजन अवघे 171 ग्रॅम आहे आणि त्याची जाडी 7.80 मिमी आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षिततेसाठी या फोनला IP68 रेटिंग मिळालेली आहे.

कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी

फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी यात अपग्रेड केलेला कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या मागील बाजूला f/1.6 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा मुख्य वाईड अँगल कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरच्या बाजूला 12 मेगापिक्सलचा ट्रूडेप्थ कॅमेरा मिळतो.

कनेक्टिव्हिटीसाठी यात 5जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी आणि चार्जिंगसाठी आधुनिक यूएसबी टाइप-सी पोर्ट दिलेला आहे.

हे देखील वाचा – Karnataka Political Crisis: कर्नाटक राजकारणात मोठा भूकंप! मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देण्याची शक्यता; डीके शिवकुमार यांच्याकडे सत्ता?

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या