Hyundai Venue Knight Edition: भारतीय बाजारपेठेतील कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी ह्युंदाईने आपली प्रसिद्ध कार ‘वेन्यू’ (Venue) नवीन अवतारात लाँच केली आहे. कंपनीने आज वेन्यूचे नाईट एडिशन (Knight Edition) लाँच केले असून, हे नवीन व्हर्जन आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि आक्रमक लूकसह येते. विशेष म्हणजे, ह्युंदाईच्या नाईट सीरिजने 2022 पासून आतापर्यंत 92,000 पेक्षा जास्त युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.
Hyundai Venue Knight Edition: डिझाइनमध्ये काय आहे खास?
नवीन ह्युंदाई वेन्यू नाईट एडिशनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची ऑल-ब्लॅक थीम.
- बाह्य लूक: फ्रंटमध्ये ब्लॅक पेंट केलेली ग्रिल, मॅट ब्लॅक लोगो आणि नवीन स्किड प्लेट्समुळे ही कार अधिक दमदार दिसते.
- स्पोर्टी टच: ब्लॅक आऊट साईड मिरर, रूफ रेल्स आणि ब्लॅक अलॉय व्हील्स या डार्क थिमला पूर्ण करतात. लाल रंगाचे ब्रेक कॅलिपर या ब्लॅक लूकला जबरदस्त कॉन्ट्रास्ट देतात.
- बॅजिंग: कारवर दिलेली ‘नाईट’ बॅजिंग तिला रेग्युलर मॉडेलपेक्षा वेगळी आणि प्रीमियम बनवते.
Hyundai Venue Knight Edition: इंटिरिअर आणि नवीन फीचर्स
कारच्या आतमध्येही ब्लॅक थीम कायम ठेवण्यात आली आहे. केबिनमध्ये ब्रास रंगाचे इन्सर्ट्स वापरले आहेत, ज्यामुळे इंटिरिअर अधिक एलिगंट वाटते.
- डॅशकॅम: सुरक्षिततेच्या दृष्टीने कंपनीने HX6T, HX10 आणि N10 यांसारख्या टॉप व्हेरियंटमध्ये डॅशकॅम दिला आहे. हा डॅशकॅम विविध रेकॉर्डिंग मोड्ससह येतो.
- सीट्स: सीट्सवर खास डिझाइनचे अपहोल्स्ट्री वापरण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होईल.
Hyundai Venue Knight Edition: इंजिन आणि परफॉर्मन्स
ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन यामध्ये इंजिनचे तीन पर्याय देण्यात आले आहेत:
- 1.2 लिटर पेट्रोल: हे इंजिन 88 hp पॉवर आणि 114 Nm टॉर्क निर्माण करते (मॅन्युअल गिअरबॉक्स).
- 1.0 लिटर टर्बो पेट्रोल: अधिक वेगासाठी हे इंजिन 120 hp पॉवर आणि 172 Nm टॉर्क जनरेट करते.
- 1.5 लिटर डिझेल: हे इंजिन 116 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
Hyundai Venue Knight Edition: व्हेरियंट आणि किंमत (एक्स-शोरूम):
| व्हेरियंट | इंजिन | ट्रान्समिशन | किंमत (रु.) |
|---|---|---|---|
| HX 5 | 1.2L पेट्रोल | मॅन्युअल | 9,69,800 |
| HX 5 | 1.5L डिझेल | मॅन्युअल | 11,11,800 |
| HX 6T | 1.2L पेट्रोल | मॅन्युअल | 11,03,200 |
| HX 8 | 1.5L डिझेल | ऑटोमॅटिक | 13,84,800 |
| HX 10 | 1.0L टर्बो पेट्रोल | ड्युअल-क्लच | 14,79,000 |










