Jio OTT Plan: कमी किमतीत जास्त मनोरंजन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने एक जबरदस्त प्लॅन सादर केला आहे. जर तुम्हाला डेटासोबतच नवनवीन सिनेमे आणि वेब सिरीज पाहण्याची आवड असेल, तर जिओचा २०० रुपयांचा हा प्लॅन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Jio OTT Plan: जिओच्या २०० रुपयांच्या प्लॅनची वैशिष्ट्ये
- व्हॅलिडिटी: या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 28 दिवसांची वैधता मिळते.
- डेटा: इंटरनेट वापरासाठी कंपनी या प्लॅनमध्ये एकूण 5GB हाय-स्पीड डेटा ऑफर करत आहे.
- ओटीटी फायदे: यामध्ये YouTube Premium, Amazon Prime Video (मोबाईल एडिशन) आणि JioHotstar चे सबस्क्रिप्शन मिळते.
- इतर ॲप्स: याशिवाय Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Hoichoi, Planet Marathi आणि Chaupal यांसारख्या 10 पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा आनंद घेता येईल.
- कॉलिंग आणि एसएमएस: लक्षात ठेवा, हा एक डेटा आणि मनोरंजन प्लॅन असल्याने यामध्ये मोफत कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा उपलब्ध नाही.
Jio OTT Plan: प्लॅन कसा सुरू करायचा?
हा प्लॅन तुम्ही ‘MyJio’ ॲप किंवा जिओच्या अधिकृत वेबसाईटवरून रिचार्ज करू शकता. काही ओटीटी सेवांचे सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी तुम्हाला कूपन कोड किंवा संबंधित ॲपमध्ये जाऊन ते ॲक्टिव्हेट करावे लागेल. जर तुम्हाला फक्त JioHotstar चे सबस्क्रिप्शन हवे असेल, तर कंपनीचा 149 रुपयांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये 90 दिवसांसाठी सबस्क्रिप्शन दिले जाते.
किंमत: रिलायन्स जिओच्या या एंटरटेनमेंट प्लॅनची किंमत 200 रुपये आहे.
हे देखील वाचा –










