Home / महाराष्ट्र / Mumbai Pune Expressway Missing Link: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर सेल्फीचा नाद पडेल महागात! गाडी थांबवल्यास भरावा लागणार मोठा दंड

Mumbai Pune Expressway Missing Link: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर सेल्फीचा नाद पडेल महागात! गाडी थांबवल्यास भरावा लागणार मोठा दंड

Mumbai Pune Expressway Missing Link Rules: यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘कनेक्टिंग लिंक’ (मिसिंग लिंक) आता वाहतुकीसाठी खुली झाली...

By: Team Navakal
Mumbai Pune Expressway Missing Link Rules
Social + WhatsApp CTA

Mumbai Pune Expressway Missing Link Rules: यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘कनेक्टिंग लिंक’ (मिसिंग लिंक) आता वाहतुकीसाठी खुली झाली आहे. मात्र, या मार्गावरील नयनरम्य केबल स्टेड ब्रिज आणि भव्य बोगदे पाहिल्यानंतर अनेक वाहनचालक सेल्फी, फोटो आणि रिल्स काढण्यासाठी आपली वाहने रस्त्यातच थांबवत आहेत. प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेतली असून वाहनचालकांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे.

Mumbai Pune Expressway Missing Link: सेल्फी आणि रिल्ससाठी गाडी थांबवली तर मोठा दंड

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) निदर्शनास आले आहे की, अनेक पर्यटक आणि प्रवासी फोटो काढण्यासाठी पुलावर किंवा बोगद्याजवळ गाड्या थांबवत आहेत. द्रुतगती मार्गावर अशा प्रकारे वाहने थांबवण्यास सक्त मनाई आहे. यामुळे पाठीमागून येणाऱ्या वेगवान वाहनांचा अपघात होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे आता रिल्स किंवा फोटो काढताना आढळल्यास संबंधितांवर मोठा दंड आकारला जाणार आहे.

२४ तास सीसीटीव्हीची नजर

या संपूर्ण प्रकल्पात दोन बोगदे आणि दोन पुलांचा समावेश आहे. या संपूर्ण भागावर २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे लक्ष ठेवले जात आहे. हायटेक कॅमेऱ्यांच्या मदतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गाड्यांचे नंबर टिपले जाणार असून थेट ई-चलन पाठवण्यात येणार आहे.

Mumbai Pune Expressway Missing Link: वेग मर्यादा किती?

महामार्ग पोलिसांनी सुरक्षित प्रवासासाठी या नवीन लिंकवर वेग मर्यादाही निश्चित केली आहे:

  • हलकी वाहने (कार): ताशी १०० किमी.
  • बस आणि जड प्रवासी वाहने: ताशी ८० किमी.

बोगद्यामध्ये प्रवासाचा वेग निश्चित असल्याने विनाकारण वेग वाढवणे किंवा कमी करणे दोन्ही धोक्याचे ठरू शकते.

Mumbai Pune Expressway Missing Link: सुरक्षित प्रवासाचे आवाहन

बेजबाबदार वर्तनामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हा प्रकल्प प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि सुखकर प्रवासासाठी बांधण्यात आला आहे. त्यामुळे नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे एमआरडीसी आणि महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा –  ‘या’ तारखेपासून सुरू होतोय Amazon Great Summer Sale; लोकप्रिय स्मार्टफोन्सवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट; पाहा ऑफर

Web Title:
संबंधित बातम्या