Motorola Edge 50 Ultra Amazon deal: जर तुम्ही सध्या ४०,००० रुपये बजेटमध्ये एक दिसायला चांगला आणि कामगिरीत नंबर वन असलेला प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ऑनलाईन मार्केटमध्ये एक जबरदस्त ऑफर आली आहे. मोटोरोलाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘मोटोरोला एज ५० अल्ट्रा ५जी’ सध्या अॅमेझॉनवर अत्यंत स्वस्त किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.
हे मॉडेल काही महिने जुना असले तरीही त्याचा स्लिम डिझाईन, पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स असलेला कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर यामुळे हा फोन आजही बाजारातील बड्या फोन्सला टक्कर देतो. अॅमेझॉनवरील ही ऑफर मर्यादित काळासाठी असण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया या फोनवरील डिस्काउंट आणि त्याच्या खास फीचर्सबद्दल.
Motorola Edge 50 Ultra Amazon deal: किंमत, बँक ऑफर्स आणि भन्नाट एक्सचेंज डिस्काउंट
अॅमेझॉनवर या फोनच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली असून ग्राहकांसाठी खालील ऑफर्स उपलब्ध आहेत:
- फ्लॅट डिस्काउंट: या फोनची मूळ किंमत ६४,९९९ रुपये आहे. परंतु, सध्या अॅमेझॉनवर तो थेट ३८,८९० रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना कोणत्याही अटीशिवाय २६,१०९ रुपयांची थेट सूट मिळत आहे.
- बँक ऑफर: पंजाब नॅशनल बँकेच्या कार्डद्वारे खरेदी केल्यास १,००० रुपयांचा अतिरिक्त इन्स्टंट डिस्काउंट मिळेल, ज्यामुळे या फोनची प्रभावी किंमत ३७,८९० रुपये होईल.
- एक्सचेंज ऑफर: जर तुम्हाला तुमचा जुना फोन बदलून हा फोन घ्यायचा असेल, तर अॅमेझॉनवर जुन्या फोनच्या बदल्यात तब्बल ३६,६५० रुपये पर्यंतचे एक्सचेंज मूल्य मिळू शकते. अर्थात, हे मूल्य तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.
- ईएमआय पर्याय: बजेट कमी असल्यास काळजी करण्याची गरज नाही, ग्राहक महिना केवळ १,३६७ रुपयांपासून सुरू होणाऱ्या विनाव्याज ईएमआय (नो-कॉस्ट ईएमआय) पर्यायावरही हा फोन घरी आणू शकतात.
Motorola Edge 50 Ultra Amazon deal: स्पेसिफिकेशन्स
या फोनचे फीचर्स त्याला एका खऱ्या अर्थाने प्रीमियम डिव्हाईस बनवतात:
- डिस्प्ले आणि डिझाईन: फोनमध्ये ६.७ इंचाचा पीओएलईडी (pOLED) डिस्प्ले दिला आहे, जो १४४Hz रिफ्रेश रेट आणि २,५०० निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. याचा स्क्रीन अनुभव अत्यंत स्मूद आहे.
- प्रोसेसर आणि परफॉर्मन्स: वेगवान कामगिरीसाठी यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८एस जेन ३ प्रोसेसर वापरण्यात आला आहे. सोबतच १२GB रॅम आणि ५१२GB चे अवाढव्य अंतर्गत स्टोरेज मिळते.
- बॅटरी आणि चार्जिंग: फोनमध्ये ४,५००mAh ची बॅटरी आहे, जी १२५W च्या सुपरफास्ट वायर चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष म्हणजे यात ५०W चे वायरलेस चार्जिंग देखील दिले आहे.
डीएसएलआर सारखा कॅमेरा सेटअप
फोटोग्राफीच्या बाबतीत हा फोन सर्वोत्तम आहे. याच्या बॅक पॅनलवर तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि दूरचे फोटो स्पष्ट काढण्यासाठी ६४ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. रील आणि सेल्फी शौकिनांसाठी समोरच्या बाजूलाही ५० मेगापिक्सलचा तगडा फ्रंट कॅमेरा मिळतो.
हे देखील वाचा – Sonam Wangchuk CJP: ‘मी सन्माननीय झुरळ!’ सोशल मीडियावरील ‘कॉकरोच’ आंदोलनाला सोनम वांगचुक यांचा जाहीर पाठिंबा









