Paneer Side Effects: शाकाहारी जेवणामध्ये पनीरला आरोग्यासाठी सर्वात उत्तम आणि फायदेशीर मानले जाते. शरीराला भरपूर प्रोटीन मिळवून देणारा एक मुख्य स्त्रोत म्हणून अनेक जण आपल्या रोजच्या आहारात पनीरचा समावेश करतात. जिम लावलेले तरुण किंवा डाएट करणारे लोक आवर्जून पनीर खातात. मात्र, प्रत्येक व्यक्तीसाठी पनीर फायदेशीर ठरेलच असे नाही.
जसे प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आणि तोटे असतात, तसेच पनीरचे देखील आहेत. पनीरमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काही विशिष्ट आजार असलेल्या लोकांनी दररोज किंवा जास्त प्रमाणात पनीर खाणे टाळले पाहिजे.
Paneer Side Effects: ‘या’ 5 प्रकारच्या लोकांनी पनीर खाणे टाळावे
१. हृदयविकार आणि हाय कोलेस्टेरॉलचे रुग्ण: फुल फॅट पनीरमध्ये फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. ज्या लोकांच्या शरीरात आधीच बॅड कोलेस्टेरॉल वाढलेले आहे किंवा ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहेत, त्यांनी जास्त पनीर खाऊ नये. याच्या अतिसेवनाने हृदयविकाराचा धोका अधिक वाढू शकतो.
२. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक: पनीरमध्ये प्रोटीन असले तरी त्यात कॅलरीज आणि फॅटचे प्रमाणही भरपूर असते. जर तुम्ही पनीर जास्त तेल, बटर किंवा क्रीम घालून भाजीच्या स्वरूपात खात असाल, तर तुमचे वजन कमी होण्याऐवजी वेगाने वाढू शकते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मर्यादित प्रमाणात आणि केवळ लो-फॅट पनीरच खाणे योग्य ठरते.
३. किडनीचा त्रास असलेले रुग्ण: किडनीशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांना डॉक्टरांकडून नेहमी कमी प्रोटीन घेण्याचा सल्ला दिला जातो. पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने, त्याचे अतिसेवन केल्यास किडनीवर अतिरिक्त ताण पडतो आणि समस्या वाढू शकते.
४. लॅक्टोज इनटॉलरन्सची समस्या असलेले लोक: काही लोकांच्या शरीराला दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ पचत नाहीत, म्हणजेच त्यांना याची अॅलर्जी असते. अशा लोकांनी पनीर खाल्ल्यास पोटात गॅस होणे, पोटदुखी, पोट फुगणे किंवा जुलाब होणे अशा पचनाच्या गंभीर तक्रारी सुरू होतात.
५. हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण: बाजारात मिळणाऱ्या प्रोसेस्ड पनीरमध्ये टिकवून ठेवण्यासाठी मिठाचा वापर जास्त केलेला असू शकतो. शरीरात सोडियमचे प्रमाण वाढल्यास हाय बीपीच्या रुग्णांना त्रास होतो. त्यामुळे अशा लोकांनी बाजारातील पनीरऐवजी घरी बनवलेले ताजे आणि कमी मिठाचे पनीर खाणे सुरक्षित ठरते.
Paneer Side Effects: दिवसभरात किती पनीर खाणे योग्य?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एका सुदृढ आणि निरोगी व्यक्तीने दिवसाला 50 ते 100 ग्रॅम पनीर खाणे पुरेसे मानले जाते. यापेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात नको असलेल्या कॅलरीज आणि फॅट वाढू लागतात. त्यामुळे पनीर खाताना ते आपल्या संतुलित आहाराचा एक मर्यादित भाग असावा, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा – IPL 2026 Playoff Schedule: आयपीएल प्ले-ऑफचे चित्र स्पष्ट! ‘या’ संघात होणार सामने; पाहा संपूर्ण शेड्युल










