Jio OTT Pass : भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये नेहमीच नवनवे आणि खिशाला परवडणारे प्लॅन्स आणण्यासाठी रिलायन्स जिओ प्रसिद्ध आहे. आता कंपनीने देशातील कोट्यवधी युजर्ससाठी एक भन्नाट ‘जिओ ओटीटी पास’ लाँच केला आहे. हा पास म्हणजे मनोरंजन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा एक संपूर्ण डोस आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार, या पासमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधांची बाजारातील मूळ किंमत साधारणपणे 1,500 रुपये प्रति महिना इतकी होते. मात्र, जिओने आपल्या ग्राहकांसाठी हा संपूर्ण एंटरटेनमेंट पॅक अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून दिला आहे.
Jio OTT Pass : किंमत आणि व्हॅलिडिटी किती?
जिओच्या या नवीन एंटरटेनमेंट पासची किंमत आणि उपलब्धता खालीलप्रमाणे आहे:
- किंमत आणि मुदत: या जिओ ओटीटी पासची किंमत केवळ 200 रुपये ठेवण्यात आली असून याची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.
- कसे खरेदी करावे?: हा पास देशातील सर्व टेलिकॉम सर्कल्समध्ये उपलब्ध झाला आहे. ग्राहक मायजिओ अॅप, जिओची अधिकृत वेबसाईट, रिटेल स्टोर्स किंवा इतर रिचार्ज अॅप्सवरून हा पास अॅक्टिव्हेट करू शकतात.
- महत्त्वाची अट: हा एक अॅड-ऑन पॅक आहे. म्हणजेच याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांच्या नंबरवर कोणताही एक बेस प्लॅन आधीपासूनच अॅक्टिव्ह असणे बंधनकारक आहे. या पासमध्ये स्वतंत्रपणे व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळत नाही.
Jio OTT Pass : यूट्यूब प्रीमियमसह १५ ओटीटी प्लॅटफॉर्म्स मोफत
या पासचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे युजर्सना एकाच रिचार्जमध्ये अनेक महागड्या अॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- यूट्यूब प्रीमियम: या पाससोबत ग्राहकांना यूट्यूब प्रीमियमचे सबस्क्रिप्शन बंडल स्वरूपात दिले जात आहे. ज्यामुळे ग्राहकांना विना-जाहिरात व्हिडिओ पाहणे, बॅकग्राउंड प्लेबॅक आणि ऑफलाईन डाउनलोड सारखे प्रीमियम फायदे मिळतील.
- मुख्य ओटीटी अॅप्स: यात जिओहॉटस्टार मोबाईल + हॉलिवूड आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या मोबाईल एडिशनचा अॅक्सेस मिळतो.
- जिओटीव्हीवरील इतर अॅप्स: याशिवाय जिओटीव्हीच्या माध्यमातून सोनी लिव्ह, झी५, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सन नेक्स्ट, फॅनकोड, कांच लांका, प्लॅनेट मराठी, चौपाल, होईचोई, टाइम्सप्ले आणि तरंग प्लस यांसारखे आणखी 12 स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स पाहता येतील.
Jio OTT Pass : १,००० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्स
ओटीटी प्लॅटफॉर्म्ससोबतच या पासमध्ये जिओटीव्ही अॅपच्या माध्यमातून 1,000 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्सचा अॅक्सेस मिळतो. यामध्ये जिओस्टार, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन, सन टीव्ही नेटवर्क, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी आणि ईटीव्ही यांसारख्या मोठ्या ब्रॉडकास्टर्सच्या 150 पेक्षा जास्त पेड चॅनेल्सचा समावेश आहे. मनोरंजन, सिनेमे, खेळ आणि लहान मुलांच्या कार्यक्रमांचा आनंद ग्राहकांना घेता येईल.
Jio OTT Pass : इंटरनेट डेटाचा मोठा फायदा
इंटरनेट वापरासाठी कंपनीने या प्लॅनमध्ये उत्तम डेटा बेनिफिट्स दिले आहेत:
अन्लिमिटेड ५जी: जे ग्राहक जिओच्या ५जी नेटवर्कसाठी पात्र आहेत, त्यांना पूर्णपणे अनलिमिटेड ५जी डेटा वापरता येईल. हा अनलिमिटेड डेटा ग्राहकाच्या चालू असलेल्या मूळ बेस प्लॅनच्या मुदतीनुसार जास्तीत जास्त 28 दिवसांपर्यंत वैध राहील.
हाय-स्पीड डेटा: या पासमध्ये ग्राहकांना एकूण 30GB हाय-स्पीड 4G/5G डेटा मिळतो.
हे देखील वाचा – Vaibhav Sooryavanshi IPL Record: 15 वर्षांच्या पोराचा धमाका! ख्रिस गेलचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडत वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास











