Tata Punch Facelift Details : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी टाटा मोटर्सने आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV ‘टाटा पंच’चे फेसलिफ्ट मॉडेल काही महिन्यांपूर्वी लाँच केले होते. जर तुम्ही या SUV चे बेस मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट कमी असेल, तर काळजी करू नका. फक्त 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून तुम्ही ही कार आपल्या घरी नेऊ शकता.
टाटा पंच फेसलिफ्टची किंमत किती?
टाटा पंचच्या बेस व्हेरिएंटचे नाव ‘Smart’ असे आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.65 लाख रुपये आहे. जर आपण आरटीओ रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स आणि इतर टॅक्स ग्राह्य धरले, तर या कारची ऑन-रोड किंमत साधारणपणे 6.21 लाख रुपयांपर्यंत जाते. यामध्ये सुमारे 22 हजार रुपये रजिस्ट्रेशन आणि 34 हजार रुपये इन्शुरन्सचा समावेश आहे.
2 लाखांच्या डाउन पेमेंटवर EMI चे गणित:
जर तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले, तर तुम्हाला उर्वरित 4.21 लाख रुपयांचे बँक लोन घ्यावे लागेल.
- कर्जाची रक्कम: 4.21 लाख रुपये
- व्याजदर: 9 टक्के (अंदाजे)
- कालावधी: 7 वर्षे
या हिशोबाने तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा फक्त 6,776 रुपये इतका मासिक हप्ता (EMI) भरावा लागेल.
एकूण किती पडणार महागात?
जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी कर्ज घेतले, तर तुम्हाला या कालावधीत सुमारे 1.48 लाख रुपये फक्त व्याजापोटी द्यावे लागतील. अशा प्रकारे, कारची मूळ किंमत आणि व्याज मिळून तुम्हाला ही कार एकूण 6.69 लाख रुपयांना पडेल.
कोणाशी आहे स्पर्धा?
टाटा पंच ही कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील एक शक्तिशाली गाडी आहे. बाजारपेठेत या कारची थेट स्पर्धा ह्युंदाई एक्सटर, निसान मॅग्नाईट आणि रेनॉल्ट कायगर यांसारख्या गाड्यांशी आहे. सुरक्षितता आणि बजेटमध्ये बसणारी कार म्हणून टाटा पंचला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.
हे देखील वाचा –










