छत्रपती संभाजी नगर- शहरातील सोनेरी महाल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात येत्या २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान वेरूळ अजिंठा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.या महोत्सवात जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी आणि वेरुळ अजिंठा आंतरराष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आस्तिककुमार पांडेय यांनी केले आहे.
आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की,या महोत्सवात जागतिक दर्जाच्या सुप्रसिद्ध कलाकारांमार्फत शास्त्रीय व उपशास्त्रीय,गायन,वादन आणि शास्त्रीय नृत्ये सादर केली जाणार आहेत.संध्या पुरेचा,प्रियंका बर्वे,अमान व अयान,कैलाश खैर तसेच वैदेही परशुरामी,उर्मिला कानेटकर – कोठारी,श्रेया घोषाल आणि अन्य कलाकारांचा यात समावेश आहे.या आंतरराष्ट्रीय महोत्सवाची नांदी असलेला पूर्वरंग कार्यक्रम शनिवार २० जानेवारी रोजी होणार असून त्याचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,
केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे