Pune Jamavbandi Order: पुणे शहरात कायदा, सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यात आज रात्रीपासून (26 मे) प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिकेने याबाबतचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून, शहरात पुढील 14 दिवसांसाठी ही जमावबंदी कायम राहणार आहे.
या कडक आदेशांमुळे संपूर्ण पुणे शहरात प्रशासकीय पातळीवर मोठे बदल पाहायला मिळतील.
Pune Jamavbandi Order: आंदोलन, मोर्चे आणि सभांवर घालण्यात आली बंदी
पुणे महानगरपालिकेने जारी केलेल्या या नवीन नियमांनुसार, पुढील 14 दिवसांच्या जमावबंदीच्या कालावधीत शहरात कोणत्याही प्रकारची आंदोलने, मोर्चे, जाहीर सभा किंवा एकत्र जमण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Pune Jamavbandi Order: सोबतच इंधन बचतीसाठी पुणे मनपाचे कडक पाऊल
या जमावबंदीच्या आदेशासोबतच, पुणे महानगरपालिकेच्या वाहनांसाठी होणारा वाढता इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडून वाहनांचा होत असलेला अवाजवी वापर आणि अनावश्यक प्रवास रोखण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी सर्व विभागप्रमुखांना इंधन बचतीचे तातडीचे निर्देश दिले आहेत.
पश्चिम आशियाई संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियमचे दर वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन वापरात काटकसर करण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर पुणे मनपाने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी खालील नियमावली जाहीर केली आहे:
- सार्वजनिक वाहतुकीचा वापर: मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामासाठी मंत्रालय, उच्च न्यायालय किंवा इतर ठिकाणी ये-जा करण्यासाठी एसटी बस, रेल्वे यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा.
- आठवड्यातून एक दिवस मेट्रो: सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील किमान 1 दिवस मेट्रो, लोकल ट्रेन किंवा सार्वजनिक बसने प्रवास करणे बंधनकारक आहे.
- कार पूल आणि ऑनलाईन मिटिंग्ज: एकाच ठिकाणी जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वाहन वापरण्याऐवजी ‘कार पूल’ करून एकाच गाड्याने प्रवास करावा. तसेच सर्व बैठका, चर्चासत्रे आणि प्रशिक्षणे प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावीत.
देखभाल, इंधन आणि चालकांवर होणारा महापालिकेचा अतिरिक्त खर्च कमी करून तिजोरीवरील ताण हलका करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे देखील वाचा – LPG Cylinder New Rules: गॅस ग्राहकांसाठी नवीन नियम लागू! ‘या’ तारखेपर्यंत PNG न घेतल्यास LPG कनेक्शन होणार बंद











