Home / महाराष्ट्र / Rohit Pawar : दुःख विसरून पुन्हा सावरले ‘साहेब’; त्या वयात उपचारांचं धाडस कुणीच केलं नसतं”;  रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन..

Rohit Pawar : दुःख विसरून पुन्हा सावरले ‘साहेब’; त्या वयात उपचारांचं धाडस कुणीच केलं नसतं”;  रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन..

Rohit Pawar : मराठेशाहीच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक, व्यासंगी लेखक आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे गेल्या महिन्यात २६ मार्च...

By: Team Navakal
Rohit Pawar
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar : मराठेशाहीच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक, व्यासंगी लेखक आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे गेल्या महिन्यात २६ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि ऐतिहासिक संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार रोहित पवार यांनी आज कोल्हापूरचा दौरा करून डॉ. पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

इतिहासाचा दीपस्तंभ हरपला-
डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिव-शाहू विचारांच्या प्रसारासाठी आणि ऐतिहासिक सत्याच्या संशोधनासाठी अर्पण केले होते. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याला आणि त्यांच्या क्रांतिकारी निर्णयांना ग्रंथसंपदेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेण्याचे अमूल्य कार्य त्यांनी केले. करवीर नगरीच्या इतिहासाचे ते खऱ्या अर्थाने विधाते मानले जात. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

रोहित पवार यांनी व्यक्त केल्या भावना-
कोल्हापूर दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पत्नी ‘माई’ आणि त्यांच्या दोन कन्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी डॉ. पवारांच्या साहित्यावर आणि त्यांच्या पुढील कार्यावर चर्चा करण्यात आली.

“अजितदादांच्या निधनानंतर साहेब काहीसे खचले होते-
ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी आलेले आमदार रोहित पवार यांनी अत्यंत भावूक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी केवळ डॉ. पवारांच्या ऐतिहासिक कार्याचाच नव्हे, तर पवार कुटुंबीयांशी असलेल्या त्यांच्या घनिष्ठ कौटुंबिक स्नेहाचाही उल्लेख केला. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि डॉ. जयसिंगराव पवार यांच्यातील मैत्रीचे आणि आदराचे नाते किती गडद होते, हे त्यांच्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणवले.

पुत्रतुल्य स्नेहाचा विरह: साहेबांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम-
रोहित पवार यांनी यावेळी एक अत्यंत खाजगी आणि भावनिक बाजू मांडली. यावेळी रोहित पवार म्हणाले, अजितदादांचं निधन झाल्यानंतर साहेब थोडे मानसिक दृष्टिकोनातून खचले गेले होते. अर्थात मुलासारखेच होते ते, त्यामुळं थोडीशी तब्यत डाऊन झाली होती. महत्वाचं म्हणजे या वयात ट्रीटमेंट करायचं धाडस कोण करत नाही, पण साहेब त्यातून बाहेर आल्याचे देखील ते म्हणाले.

इतिहासाचे भाष्यकार डॉ. जयसिंगराव पवार: उपेक्षितांच्या आवाजाला शब्दरूप देणारा महामेरू-
मराठेशाहीचा देदीप्यमान इतिहास पुराव्यांच्या आणि संशोधनाच्या कसोटीवर उतरवून तो जागतिक स्तरावर नेणाऱ्या महान इतिहासकारांमध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. केवळ सनावळ्या आणि युद्धांचे वर्णन न करता, इतिहासाच्या पानात उपेक्षित राहिलेल्या घटकांना आणि भूमीपुत्रांच्या पराक्रमाला न्याय देण्याचे व्रत त्यांनी आयुष्यभर जपले. त्यांच्या निधनानंतर, त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा आज इतिहासाच्या अभ्यासकांसाठी एक दीपस्तंभ ठरली आहे.

संशोधन कारकिर्दीची मुहूर्तमेढ-
डॉ. जयसिंगराव पवार यांच्या संशोधन प्रवासाची सुरुवात १९६४ मध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून झाली. थोर इतिहासतज्ज्ञ डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या अभ्यासाला प्रारंभ केला. एका निष्ठवान अभ्यासकाची वृत्ती घेऊन त्यांनी इतिहासाच्या आधारे समाजपरिवर्तनाचे स्वप्न पाहिले. कोल्हापूरच्या मातीतील शौर्य आणि विचार विश्वाच्या नकाशावर उमटवण्यासाठी त्यांनी गेली सहा दशके अविश्रांत परिश्रम घेतले.

राजर्षी शाहू विचारांचे वैश्विक दस्तऐवजीकरण
डॉ. पवारांच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण म्हणजे त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर सिद्ध केलेला महाग्रंथ. तब्बल १२०० पृष्ठांचा हा प्रदीर्घ आणि संशोधनात्मक ग्रंथ म्हणजे केवळ चरित्र नसून, तो शाहू महाराजांच्या समतावादी विचारांचा एक वैश्विक दस्तऐवज ठरला आहे. शाहू महाराजांचे आरक्षण धोरण, त्यांचे शैक्षणिक कार्य आणि बहुजन समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ जगासमोर मांडण्याचे ऐतिहासिक कार्य या ग्रंथामुळे यशस्वी झाले. हा ग्रंथ आजही जागतिक पातळीवर शाहू विचारांचा प्रसार करणारा सर्वात विश्वासार्ह संदर्भ मानला जातो.

स्त्री-नेतृत्वाचा सन्मान: ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’
तब्बल ६० वर्षांच्या प्रदीर्घ तपश्चर्येनंतर डॉ. पवारांनी ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ हा प्रमाण ग्रंथ लिहून मराठा साम्राज्याच्या रक्षणासाठी मोगलांशी दोन हात करणाऱ्या करवीरच्या अधिष्ठात्रीला योग्य न्याय मिळवून दिला. इतिहासलेखनात अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या महाराणी ताराबाईंच्या रणनीतीचे आणि त्यांच्या अजोड नेतृत्वाचे दर्शन त्यांनी पुराव्यांसह घडवले. स्त्री-नेतृत्वाची बुलंद गाथा मांडणारा हा ग्रंथ मराठी साहित्यातील आणि इतिहासातील एक अनमोल ठेवा ठरला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या